सुनिल कंगले यांचे निधन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव येथील कंगले अॅन्ड सन्स चे संचालक सुनील दत्तात्रेय कंगले (वय ६३) यांचे निधन झाले आहे.त्यांचे पश्चात वडील(दत्तोपंत), पत्नी(सीमा) ,भाऊ(अनिल) , मुलगा(कुणाल), मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
स्व. सुनील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले स्वयंसेवक होते.शेती व सहकार यावर त्यांचा दांडगा अभ्यास होता. कोपरगांव पिपल्स बॅंकेचे सुमारे ३५ वर्षापासून संचालक होते. तसेच त्यांनी पिपल्स बॅंकेचे चेअरमन म्हणून उल्लेखनीय पदभार पाहिला. जिल्हा नागरी बँकेवर संचालक होते. सामाजिक क्षेत्रातील रोटरी क्लब कोपरगांवचे अध्यक्ष काळात विविध सामाजिक उपक्रम त्यांनी हाती घेऊन पुर्णत्वास नेले होते. भारतीय जनता पक्षाचे कोपरगांव शहराध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.अनेक नामांकित व्यक्ती सोबत त्यांचे मित्रत्वाचे संबंध राहिले आहे.राज्यभर दांडगा जनसंपर्क असलेले प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व सुनीलजी कंगले यांचे निधननाने कंगले मित्र परिवारासह कोपरगांवकरांनी दु:ख व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *