
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर – श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते कोपरगाव येथील श्री संत नरहरी विठ्ठल मंदिरात श्री संत शिरोमणी नरहरी महाराजांची महापूजा करण्यात आली. सौ. चैतालीताई काळे यांनी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच यावेळी आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होवून महिला भगिनींसमवेत पंक्तीत बसून महाप्रसादाचा देखील लाभ घेतला.

यावेळी लाड सुवर्णकार मित्र मंडळ संस्थेचे अध्यक्ष संतोष देवळालीकर, कार्याध्यक्ष कैलास नागरे, अनिकेत भडकवाडे, संदीप कपिले, ज्ञानेश कपिले, वैभव भडकवाडे, उल्हास नागरे, दत्तात्रयजी उदावंत, सौ. वैशाली मंडलिक, सौ. योगिता माळवे, राहुल देवळालीकर, संदीप देवळालीकर, दिपक विसपुते, अनिकेत भडकवाडे, कैलास नागरे, प्रकाश भडकवाडे, नितीन भडकवाडे, अनिल उदावंत, निरंजन उदावंत, दीपक कपिले, विजय उदावंत, सुधीर वडनेरे, विठ्ठलप उदावंत, आशिष देवळालीकर, मंगेश बागुल, पंडित यादव, नाना जाधव, राहुल बागुल, अक्षय वडनेरे, संकेत मंडलिक, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, हाजीमेहमूद सय्यद, रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, राजेंद्र वाकचौरे, सुनील शिलेदार, डॉ. अजय गर्जे, बाळासाहेब रुईकर, वाल्मिक लहिरे, ऋषीकेश खैरनार, राजेंद्र आभाळे, राजेंद्र खैरनार, विकि जोशी, प्रताप गोसावी, मनोज नरोडे, रोशन शेजवळ, राकेश शहा, शैलेश साबळे, मनोज कपोते, जनार्दन शिंदे, रिंकेश खडांगळे, राहुल आदमाने आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
