एस. एस. जी. एम. महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे राष्ट्रीय वेबिनार संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
येथील श्री. सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अँड संजीवनी कॉमर्स कॉलेजमध्ये आय. क्यु. ए. सी. व इलेक्ट्रॉनिक्स विभाग यांचे संयुक्त विद्यमाने ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी अवेअरनेस’ या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय वेबिनार ऑनलाईन संपन्न झाले. चर्चासत्रासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पेटंट ऑफिस, मुंबई येथील पेटंट परीक्षक कु.जसप्रीत कौर ह्या उपस्थित होत्या. आपल्या भाषणातून त्यांनी आय. पी. आर. विषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच पेटंट विषयीचे विविध नियम, पेटंट संदर्भात घ्यावयाची काळजी आदी बाबींविषयी विस्तृत विवेचन केले. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश सानप होते.अध्यक्षीय विचार व्यक्त करतांना ते म्हणाले की,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शोधदृष्टी समृद्ध व्हावी तसेच त्यांच्या संशोधनास चालना व संरक्षण मिळण्यासाठी आय. पी. आर. विषयीचे ज्ञान असणे महत्वाचे आहे, या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व संशोधकांचे प्रबोधन व्हावे या दृष्टीने हे चर्चासत्र अत्यंत महत्वपूर्ण आहे.
चर्चासत्राचे प्रास्ताविक इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख प्रा. घनश्याम भगत यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दिपेश मोरे यांनी केले तर प्रा. कु. सोनल लोहाटे यांनी आभार मानले. सदर चर्चासत्रासाठी महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात येथून विविध प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.

इलेक्ट्रोनिक्स विभागाच्या राष्ट्रीय वेबिनारमध्ये मार्गदर्शन करताना पेटंट ऑफिस, मुंबई पेटंट परीक्षक
कु.जसप्रीत कौर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *