३ जुलै १९११ ते ५ जुलै १९११ श्री उपासनी महाराज यांनी कोपरगाव येथे खंडोबाचे मंदिरात अनुष्ठान केले…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
३ जुलै १९११ ते ५ जुलै १९११ श्री उपासनी महाराज यांनी कोपरगाव येथे खंडोबाचे मंदिरात अनुष्ठान केले . . त्या वेळेस श्री साईबाबा त्यांच्या अनुष्ठानाला आले होते व त्यांनी तीन दिवस मुक्काम ह्या बाभुळवणात केला होता . . म्हणून तपोभुमी . . अशी नोंद खंडोबा मंदिरात आहे . . श्री साईबाबा खंडोबा उपासना सांगत . . . श्री साई बालाजी ट्रस्ट कोपरगाव सन २००९ पासुन दरवर्षी साईबाबा ची पालखी बालाजीला घेऊन जातात . . . त्यानंतर वर्षभर हि पालखी तपोभूमी मंदिरात असते . . नित्य नेमाने दर रविवारी दि २२/२/२००९ पासून कोपरगाव शहरात पालखी सेवा चालू आहे . .रविवारी धुप आरती अगोदर मंदिरात पालखी सजते . . आरती नंतर साई सेवक भजने म्हणतात . . पालखीत बाबा आसनस्थ करून बाबा खडोबा दर्शनासाठी निघतात . . साधारण ५०० मीटर अंतर भजन पाऊली च्या गजरात पालखी खंडोबा मंदिरात पोहचते . . . खंडोबा मंदिरात भजने होतात . . खंडोबाचा तळी भंडारा होतो . . . श्री साईबाबा ची साईनाम सुखदायी हि पालखी ची आरती होते . . बाबा पुन्हा पालखीत आसनस्थ होतात व नामाच्या जय घोषात पुन्हा तपोभूमीत येतात . . हा भक्ति रसाचा कार्यक्रम दर रविवारी संपन्न होतो न चुकता . . . ह्या पालखीत श्री साईबाबा चे गुरूवारचे पालखी प्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न होतो . . . असा हा सोहळा आता सन २००९ पासून कोपरगाव ची परंपरा ठरण्यास कोपरगाव चे साईभक्तांनी लाभ घ्यावा . . . एकदा तरी पालखी सेवेत येऊन भक्ती रस लुटावा . . श्री साईबाबा . . श्रीबालाजी भगवान . . व श्री खंडोबा ह्यांच्या त्रिवेणी संगमाचा लाभ घ्यावा . . .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *