
कोपरगाव प्रतिनिधी:- राष्ट्रीय महामार्ग १६० बी या रस्त्याचे काम उत्कृष्ठरीतीने सुरू झाले असून केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी सन-२०१९ मध्ये केलेला पाठपुरावा लाभदायक ठरला असल्याने या रस्त्याचे काम पूर्णत्वास जाऊन प्रवाशांची मोठी समस्या सुटणार आहे त्यासाठी ना.गडकरी साहेब व मा.आ.सौ.कोल्हे ताई यांचे चांदेकसारेचे माजी सरपंच केशवराव होन यांनी आभार मानले आहे.
कोरोनाच्या मोठ्या संकटात देखील रस्ते विकासासाठी निधीची कमतरता पडू न देता केंद्रसरकार अखत्यारीत असलेले रस्ते दुरुस्ती करण्याचे काम केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या माध्यमातून सुरू आहे.कोपरगाव मतदार संघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या खराब स्थितीबाबत माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी वारंवार केंद्रीय मंत्रालय स्तरावर पत्रव्यवहार करून रस्ते विकासासाठी निधी मिळणे कामी मागणी केलेली होती.सन २०१९ ऑक्टोबर मध्ये एन एच १६० बी या रस्त्याच्या कामासाठी मंजुरी प्राप्त झाली होती.पंरतु लॉकडाऊनमुळे काम सुरू होण्यास काहीसा उशीर झाला होता.अलीकडेच पुणतांबा फाटा ते झगडे फाटा या दरम्यानचा रस्ता दुरुस्तीचे काम सुरू झालेले असून नागरिकांमध्ये या बाबत समाधान व्यक्त केले जात आहे.माजी आमदार कोल्हे ताई यांच्या कार्यकाळात केलेले अनेक विकासात्मक कामे आणि पाठपुराव्याचा सातत्याने प्रत्यय विकास कामांच्या रूपाने आजही येतो आहे.
नागरिकांचे अनेक वर्षांपासून प्रवासाचे होणारे हाल थांबावे यासाठी सातत्याने पाठपुरावा २०१९ पूर्वी झाला त्यामुळे सध्या हे काम होऊ शकते आहे यासाठी डेप्युटी इंजिनिअर बाळासाहेब नन्नावरे यांचेही विशेष कौतूक करायला हवे कारण पुणतांबा फाटा ते तळेगाव मळे हा देखील रस्ता उत्तम रीतीने पूर्ण केलेला आहे त्याच प्रमाणे दर्जेदार काम पुणतांबा फाटा ते झगडे फाटा या रस्त्याचेही करावे अशी विनंती देखील केशवराव होन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
चौकट- एन एच १६० बी हा रस्ता चांदेकसारे ते झगडे फाटा १ कि.मी.काम बाकी असल्याने विचारणा केली असता त्यातील ३०० मीटर रस्ता हा समृद्धी महामार्ग उड्डाणपूल होणार असल्याने खोडाई काम होणार आहे तसेच उर्वरित ७०० मीटर करीता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे कडे परवानगी मागितली आहे अशी माहिती मिळाल्याचे केशवराव होन यांनी सांगितले आहे.
