
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील लक्ष्मीनगर भागातील नागरिकांना जाहीर सूचित करण्यात येते की नगर विकास विभागाचा दि. ०६/०३/२०१९ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी लक्ष्मीनगर मधील शासकीय व नगरपरिषदेच्या जमिनीवरील अतिक्रमण नियामानुकुल करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही नगरपरिषद स्तरावर सुरू आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वांसाठी घरे २०२२ च्या धोरणानुसार उक्त नमूद सर्व्हे नं. ११३ (भाग) व ११४ (भाग) लक्ष्मीनगर भागातील अतिक्रमण नियामानुकुल करणे अपेक्षित आहे. याबाबत मा. संचालक नगररचना महाराष्ट्र राज्य यांच्याकडील आदेश क्र. वि.यो. कोपरगाव / जि. अ. नगर/ शिथिलता/ प्र.क्र.७५८ /टिपीव्ही-४/८३९ दि. २१/०२/२०२३ या शिथिलता प्रस्तावास मान्यता मिळालेली आहे त्यानुसार उक्त नमूद भागातील वहिवाट करीत असणाऱ्या ज्या कुटुंबानी सर्वेक्षनामध्ये अर्ज सादर केले नाहीत अशा घरांची यादी घर क्रमांकासह नगरपरिषदेच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
सदर अतिक्रमण धारकांनी आपले अतिक्रमण नियामानुकूल करण्यासाठीचा अर्ज २५/०७/२०२३ ते ०५/०८/२०२३ पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना कक्ष, कोपरगाव नगरपरिषद, कोपरगाव येथे सादर करावा. मुदतीत अर्ज प्राप्त न झाल्यास यादीतील अतिक्रमण धारकांना या योजने अंतर्गत लाभ घ्यावयाचा नाही असे गृहीत धरुन पुढील कार्यवाही केली जाईल, त्यानंतर येणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
प्रतिसाद. न मिळालेल्या बंद घराची यादी नगरपरिषदेने प्रसिद्ध केली आहे ती खालील प्रमाणे






