गोदाम गल्ली येथे महाशिवरात्र व जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर सन्मान स्त्री शक्तीचा जागर महाशिवरात्रीचा आणि उद्घाटन सोहळा पाणपोईचा संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
महाशिवरात्र व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत गोदाम गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने स्वर्गीय शकुंतला नेमीचदजी गोधा यांच्या स्मरणार्थ गोदाम गल्ली येथे पाणपोई सुरू करण्यात आली. तसेच महिला दिनानिमित्त गोदाम गल्ली परिसरातील 70 ते 80 कर्तुत्ववान महिलांचा गोदाम गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ सुहासिनीताई कोयटे सौ किरण डागा सौ शोभना ठोळे सौ रंजना बंब श्रीमती शोभा ठोळे सौ पूजा गोधा पत्रकार अनिल दीक्षित पत्रकार नानासाहेब जवरे व पत्रकार मोबीन भाई उपस्थित होते. सदर कार्यक्रमास गोदाम गल्ली परिसरातील सर्व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
याप्रसंगी सौ सुवासिनीताई कोयटे ॲड.सौ श्रद्धा जवाद सौ किरण डागा व्यापारी महासंघाचे सचिव सुधीरजी डागा या मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
सौ प्रेरणा बंब सौ मधु उपाध्ये सौ मीना ठोळे यांनी सूत्रसंचालन केले तर सौ मेघा बजाज यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *