हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री श्री मुकेश अग्निहोत्री यांनी सहकुटुंब गुरु शुक्राचार्य महाराज यांचे घेतले दर्शन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
रविवार रोजी सकाळी 11वाजता आपल्या गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात हिमाचल प्रदेश चे उप मुख्यमंत्री श्री मुकेश अग्निहोत्री साहेब हे सह कुटुंब गुरु शुक्राचार्य महाराज्यांच्या दर्शना साठी आले होते . या प्रसंगी ट्रस्ट व गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर या संबंधी ची सविस्तर माहिती ट्रस्ट अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड यांनी दिली . त्याच प्रमाणे श्री अग्निहोत्री साहेब यांचा व कुटुंबीयांचा सत्कार ट्रस्ट अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला . माननीय उप मुख्यमंत्री यांचा आपल्या गुरू शुक्राचार्य मंदिरात हा दुसरा दौरा होता. या पूर्वी ते विरोधी पक्ष नेते होते तेंव्हाही सहकुटुंब मंदिरात दर्शनासाठी आलेले होते . मंदिरा बाबद बोलताना त्यांनी भरभरून कौतुक केले .झालेल्या नवीन सुधारणा बाबत त्यांनी ये नया बनाया है ना , ये नंही था पहेले अस आठवणीने सांगितले . त्याच प्रमाणे आम्ही परत दर्शनासाठी येऊ असे सांगितले .


या प्रसंगी मंदिर प्रमुख श्री सचिन परदेशी, उप मंदिर प्रमुख श्री प्रसाद पऱ्हे, श्री राजेंद्र पंडोरे , श्री भागचंद रुईकर , श्री विजय रोहम् , श्री मुन्ना आव्हाड , श्री विलास आव्हाड , श्री विकास शर्मा श्री बाळासाहेब लकारे , श्री दत्तात्रय सावंत, तसेच नितीन शिंदे , श्री अंभोरे , मंदिर व्यवस्थापक श्री राजाराम पावरा व सर्व भक्त उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *