पतंगबाजीचा उत्सव आनंददायी साजरा करुया:- पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांचे आवाहन….

Uncategorized

एस. जी. विद्यालय येथे पतंगबाजीत नायलॉन धागा बंदीची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ…
कोपरगाव प्रतिनिधी:-
भारतातील सण – उत्सव हे सजीवाला आनंद आणि उर्जा देतात. मात्र अलिकडच्या काळात पतंगबाजीत धारदार नायलॉन धागा वापरल्याने पक्षी-पशू आणि मनुष्यास ईजा पोहचत आहे. दूस-याला दु:ख देवून उत्सवाचे विकृतीकरण थांबविण्याचे कळकळीचे आवाहन महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांनी केले.
मकरसंक्रांत निमित्ताने कोपरगांव परिसरात पतंगबाजी करण्याची मोठी परंपरा आहे. काही वर्षांपासून पतंगबाजीत पारंपरिक धागा सोडून नायलॉन सह धारदार मांजा वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पक्षी, पशू आणि मनुष्याला ईजा पोहोचण्याचे प्रमाण वाढले आहे. या गंभीर प्रकाराबाबत पर्यावरणप्रेमी सुशांत घोडके यांनी राष्ट्रपती,प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांचे सह संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून लक्ष वेधले होते. नायलाॅन बंदीबाबत न्यायलयाने काही सुचना प्रशासनाला केल्या असून प्रशासनामार्फत नायलॉन विक्रेते आणि बाळगणारे यांचेवर कठोर कारवाई केली जात आहे.तसेच पर्यावरणप्रेमी लोकांमध्ये जनजागृती अनेक वर्षापासून करत आहेत. त्यांना लोकांमधून प्रतिसाद मिळत आहे.

एस. जी. विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांचे मार्गदर्शनाखाली पतंगबाजीत नायलॉन बंदी अभियान शालेय विद्यार्थ्यांमध्ये राबविण्यात येत आहे. शाळेतील विद्यार्थांना महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांनी मार्गदर्शन करत नायलॉन धागा मुक्त पतंगबाजीची उत्सवाची शपथ दिली.
या प्रसंगी उप मुख्याध्यापक रमेश गायकवाड,उमा रायते, सुरेश गोरे, रघुनाथ लकारे, अनिल अमृतकर,अतुल कोताडे,योगेश गवळे यांचे सह शाळेतील शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांनी लिहिलेले नायलॉन धागा बंदीबाबत शपथ…

संकल्प/शपथ
पृथ्वी माझी आई आहे. येथील विविधतेने नटलेली जीवसृष्टीचे जतन करणे माझे कर्तव्य आहे. पतंगबाजीत नायलॉन, चायना यासह धारदार धागा/मांजा वापरल्याने मनुष्य, पशू आणि पक्षी यांना गंभीर इजा पोहचत असल्याचे मला समजले आहे. त्यामुळे मकरसंक्रांती तसेच इतर कुठल्याही काळात पतंगबाजी करतांना नायलॉन, चायना यासह धारदार धागा/मांजा वापर करणार नसल्याची शपथ घेत आहे. तसेच उंच इमारतींवर पतंगबाजी करणे, वीज वाहिनीच्या तारांवर अटकलेला पतंग अथवा धागा ओढणे टाळणार आहे. माझ्या चुकीच्या वागण्याने जीवसृष्टीस हानी पोहोचेल असे कुठलेही कृत्य माझ्या कडून घडणार नाही. आपल्या भारत वर्षातील समृद्ध उत्सवाच्या पारंपरिक परंपरांचे विकृतीकरण टाळून जीवसृष्टीच्या संवर्धनासाठी सदैव तत्पर राहण्याची मी शपथ घेत आहे.
वसुधैव कुटुंबकम् !
जय हिंद !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *