
क्रीडा स्पर्धा आयोजन नियोजना साठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार – भाग्यश्री बिले मॅडम , जिल्हा क्रीडा अधिकारी , अ.नगर…
क्रीडास्पर्धा आयोजन तालुका निहाय बैठक संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-
सन २०२३.२४ या शैक्षणिक वर्षात शासकीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या नियोजन आयोजना संदर्भ जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर यांच्या वतीने प्रवरा कन्या इंग्लिश मीडियम स्कूल लोणी या ठिकाणी कोपरगाव व राहता या दोन तालुक्यातील क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा आयोजित करण्यात आलेली होती .या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती भाग्यश्री बिले मॅडम होत्या. तसेच मार्गदर्शक म्हणून श्री.ज्ञानेश्वर खुरांगे व श्री विशाल गर्जे उपस्थित होते .

सदर सहविचार सभेच्या निमित्ताने राहता तालुक्यातर्फे श्री सुनील गागरे सर व कोपरगाव तालुक्यातील श्री नितीन निकम सर यांनी स्पर्धेच्या संबंधित व क्रीडा क्षेत्रासंबंधी असलेल्या विविध अडचणी व आवश्यक सुधारणा मागणी यासंदर्भात आपले मत व्यक्त केले . तसेच विविध मागण्यांच्या संदर्भात कोपरगाव तालुका क्रीडा समितीच्या वतीने सर्व क्रीडा शिक्षकांनी निवेदन जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले मॅडम यांना दिले .

क्रीडा स्पर्धा आयोजन नियोजना साठी सर्वोतोपरी मार्गदर्शन व सहकार्य करणार असे आश्वासन जिल्हा क्रीडा अधिकारी , श्रीम.भाग्यश्री बिले मॅडम यांनी दिले
सन्माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या उपस्थितीत कोपरगाव तालुका क्रीडा समिती जाहीर करण्यात आली .या समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. सी.एम. मेहता कन्या विद्यालयातील शिक्षक श्री. नितीन निकम सर यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली . त्याचबरोबर पुढील सर्व पदाधिकारी यांची नेमणूक एकमताने करण्यात आली.
कोपरगाव तालुका क्रीडा समिती २०२३.२४ पुढीलप्रमाणे

अध्यक्ष- श्री नितीन निकम सर – डॉ सी एम मेहता कन्या विद्या मंदिर, कोपरगाव
उपाध्यक्ष – श्री नारायण शेळके सर – माध्यमिक विद्यालय ब्राम्हणगाव
उपाध्यक्ष – प्रा शिवराज पाळणे – संजीवनी ज्युनिअर कॉलेज
सचिव – श्री अनुप गिरमे – संजिवनी इंग्लिश मेडिअम स्कूल
सहसचिव – श्री नितिन सोळके सर – आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल
सहसचिव – श्री आकाश लकारे सर – एस एस जी एम कॉलेज
संपर्क प्रमुख – शिवप्रसाद घोडके – संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कूल
वरील सर्व नव निर्वाचित क्रीडा समितीचे जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष , रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य श्री.अरुण (अण्णा) चंद्रे सर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री.दिलीप घोडके सर, शारीरिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष , श्री गो विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मकरंद कोऱ्हाळकर सर , श्री राजेंद्र पाटणकर सर , प्रा अंबादास वडांगळे सर, प्रा दत्ता देवकर सर , श्री धनंजय देवकर सर , श्री निलक सर , श्री अजित पवार सर , श्री निलेश बडजाते सर , श्री बोळीज सर , श्री रमेश येवले , श्री संजय अमोलिक सर , श्री देशमुख सर , श्री गायकवाड सर , श्री दरेकर सर , प्रा मिलिंद कांबळे सर , श्री राहुल सूर्यवंशी , श्री विरुपक्ष रेड्डी , श्री रोहित महाले , श्री अक्षय येवले , श्री रिजवाण पठाण सर आणि सर्व क्रीडा शिक्षक कोपरगाव तालुका यांनी वरील नवनियुक्त क्रीडा समिती चे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
