

कोपरगाव प्रतिनिधी:-
मा. श्री राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अ.नगर, मा. श्रीमती स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर यांनी दिलेले आदेश व सुचनांनुसार पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हे पोलीस स्टेशन हददीतील अवैध धंदयाविरुध्द धडक कार्यवाही करीत आहेत.दिनांक 28/07/2023 रोजी श्री वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन यांना गोपनिय बातमी मिळाली की, सोनेवाडी येथे ताराचंद उर्फ काळु दशरथ वायकर रा. सोनेवाडी ता कोपरगाव हा अवैधरित्या गावटी हातभटटीची दारु विक्री करीता तयार करीत असल्याची माहिती मिळाली. सदर बातमीचे आधारे श्री वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन यांनी पोलीस स्टाफसह जावुन गावटी हातभटटीवर छापा टाकुन सदर ठिकाणी ईसम नामे ताराचंद उर्फ काळु दशरथ वायकर रा. सोनेवाडी ता कोपरगाव याचेकडे रुपये 28,000/- किंमतीचे 400 लिटर गावठी हातभट्टीची दारु तयार करण्यास लागणारे कच्चे रसायण जप्त करुन नाश करण्यात आलेली आहे. त्याबाबत आरोपी विरुद्ध पोकों/ 2484 प्रकाश सुरेश नवाळी यांचे फिर्यादीवरुन कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गुरनं 377/2023 महाराष्ट्र प्रोव्हीबीशन कायदा कलम 65(फ) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. श्री राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अ.नगर मा. श्रीमती स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर, मा. श्री संदिप मिटके, उपविभागीय पोलीस अधीकारी, शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री वासुदेव देसले, सहायक पोलीस उपनिरीक्षक, महेश कुसारे, सफौ / अमरनाथ गवसने पोकॉ/ 2484 प्रकाश सुरेश नवाळी व होमगार्ड / चव्हाण यांनी केली आहे.
