
कोपरगाव प्रतिनिधी (राहुरी):-
देवळाली प्रवरा येथे खास बाब म्हणून ग्रामीण रुग्णालयास मान्यता मिळणे कामी सर्व संबंधितांची बैठक आयोजित करण्यात यावी यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब यांना पत्र लिहून विनंती केले बद्दल आज राहुरी येथे महाराष्ट्र राज्य तुकडेबंदी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी शिस्टमंडळासह मंत्री तनपुरे यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य तुकडेबंदी संघर्ष व समन्वय समितीच्या वतीने देवळाली प्रवरा येथे खास बाब म्हणून ग्रामीण रुग्णालयास मान्यता मिळणे कामी आरोग्य मंत्रालयास शिफारस करावी या मागणीसाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना निवेदन देणेत आले होते. त्या निवेदनास सकारात्मक प्रतिसाद मिळालेने समितीचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी समितीच्या सदस्यांसह आज सिस्टमंडळाने राहुरी येथे राज्यमंत्री प्रजक्तदादा तनपुरे यांची भेट घेऊन चर्चा केली असता मंत्री तनपुरे म्हणाले की, अधिवेशनात माझी आरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब यांचेशी या विषयी चर्चा झाली असून साहेब देवळाली प्रवरा च्या ग्रामीण रुग्णालय प्रश्नी सकारात्मक आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब आजारी असल्याने ते जसेही बरे होतील त्यानंतर बैठक लावनार असल्याचे मंत्री टोपे यांनी सांगितल्याचे चर्चे दरम्यान आप्पासाहेब ढुस यांचेशी बोलताना राज्यमंत्री तनपुरे यांनी सांगितले.
आप्पासाहेब ढुस यांचेसह, कोशाध्यक्ष्य तथा राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे, सचिव तथा योग प्रशिक्षक किशोर थोरात, साई सेवा निधी संस्थेचे चेअरमन प्रदीप येवले आदी या प्रसंगी उपस्थित होते.
राज्यमंत्री प्रजक्तदादा तनपुरे यांना भेटून झालेल्या चर्चे वरून देवळाली च्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न लवकर मार्गी लागेल असा विश्वास आप्पासाहेब ढुस यांनी व्यक्त केला.
