संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शहरातून दिंडी काढत पंढरपूरच्या वारीचे दर्शन घडवले…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
वारकरी पोशाख, डोक्यावर तुळस, भगवी पताका उंच डोलवत,टाळाच्या सुंदर तालात फुगडीचा ठेका धरत, विठ्ठल नामाचा जयघोष करत विठ्ठल रुखमाईच्या सानिध्यात पावली,लेझिम खेळत संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शहरातून दिंडी काढत पंढरपूरच्या वारीचे दर्शन कोपरगावकराना घडवित पर्यावरणाचा समतोल राखा,वृक्ष संवर्धन हि काळाची गरज,पाणी आडवा पाणी जिरवा असे अनेक जनजागृतीपर संदेशाचे फलक विद्यार्थ्यांनी हातात घेवून जनजागृती केली.
हरी आणि वारी हा महाराष्ट्राचा जिव्हाळ्याचा विषय असून आषाढी जवळ आली की लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ती ओढ लागते पंढरपूरच्या वारीची विठ्ठलाच्या दर्शनाची लाखो वारकरी या पंढरपूरच्या वारीसाठी पायी पंढरपूरला जातात या आषाढी वारीची अनुभूती शालेय विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे संस्थापक राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक २८ जून २०२३ रोजी संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांची पायी दिंडी कोपरगाव शहरातून काढण्यात आली होती.
या पायी दिंडीतील वारकऱ्यांनी शहरातून विठठल रुक्मिणीची पालखी खांद्यावर घेत पायी चालत ही दिंडी सराफ बाजार येथील हनुमान व विठ्ठल रुख्मिणी मंदिर येथे आणण्यात आली. यावेळी वारकरी विद्यार्थ्यांनी भजन किर्तन करत हरिनामाचा जयघोष केला या दिंडीमध्ये छोट्या वारक्यांनी विठ्ठल रुखमाई , वारकऱ्यांची वेशभूषा करून हरिनामाचा जयजयकार करत फुगडी खेळत, टाळ वाजवत या वारीचा आनंद लुटला आहे.
यावेळी या सर्व विद्यार्थ्यांना जळगावकर सराफ यांच्या वतीने केळी तसेच लाडूचे वाटप करण्यात आले तर मराठा पंचचे विश्वस्त बाळासाहेब नरोडे, श्रीमंत पवार सरकार संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थान प्रमुख महेंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी व वनश्री सुशांत घोडके, व्यवस्थापक जयंत विसपुते, दिलीप गायकवाड, मनोज कपोते. यांच्या वतीने बाल-गोपाळांना दूध वाटप करण्यात आले. याप्रसंगी सोमेश्वर महादेव देवस्थानच्या वतीने या पायी दिंडीचे स्वागत करण्यात येवून पालखीचे पूजन करण्यात आले. या दिंडीत विद्यार्थी शिक्षक कर्मचारी यांच्यासह पालकांनी देखील सहभाग नोंदवत पंढरपूरच्या वारीची अनुभूती घेतली
यावेळी संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी विशाल झावरे, शाळेचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी,विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *