वारीत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा ; नियमित योगाने शारीरिक मानसिक व बौध्दिक विकास-योगशिक्षक वाल्मिक कर्डीलेसर…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जून रोजी श्री रामेश्वर विद्यालय वारी येथे भारतीय योग संस्थान दिल्ली संचलित वारी केंद्रांचे योगा शिक्षक वाल्मिक कर्डीलेसर आणि त्यांचे इतर सहकारी मार्गदर्शक यांचे उपस्थितीत योगाभ्यास प्रात्यक्षिक करत साजरा करण्यात आला यावेळी बोलतांना श्री कर्डीलेसर यांनी विध्यार्थ्यांनी शारीरिक मानसिक व बौध्दिक विकासाकरिता नियमितपणे योगा करण्याचे आवाहन केले
यावेळी योगासने प्राणायाम ध्यान करत विध्यार्थी,शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांनी योगा दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला


रयत शिक्षण संस्थेचे श्री रामेश्वर विद्यालय वारी येथे प्रतिवर्षी प्रमाणे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन शाळेच्या प्रांगणात करण्यात आले होते. श्री कैलास शेळके सर यांनी प्रास्ताविक तर जाधवसर यांनी स्वागत केले यावेळी योग साधकांचा सत्कार करण्यात आला
माजी पंचायत समिती सदस्य योग साधक अशोक कानडे यांनी भारतीय योग संस्थानच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून वारीत निशुल्क सेवा केंद्र सुरु असुन नियमितपणे सकाळी योगा होतो आहे त्याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवहान करुन योगासन, प्राणायाम, ध्यान या संदर्भात शास्त्रोक्त माहिती सांगितली,प्रभारी मुख्यध्यापक सुकटेसर यांनी यावेळी योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तर राष्ट्रीय योग शिक्षक वाल्मिक कर्डीले सर यांनी उपस्थिताना योगाचे धडे देत योग साधनेचे महत्व पटवून दिले योग शिक्षक वाल्मिक कर्डीले , अशोक कानडे यांनी यावेळी योगासनांची विविध प्रात्यक्षिके सादर केली सुक्ष्म व्यायाम,पद्मासन,भुजंगासन शलभासन त्रिकोणासन,वृक्षासन,
ताडासन,सूर्यनमस्कार ,शवासन,नावासन,अनुलोम विलोम प्राणायाम पूर्व तयारी यासह योगा संदर्भात शास्त्रोक्त माहिती देवून त्याचे निरोगी आणि उत्तम आरोग्यासाठी होणारे फायदे सांगितले.याप्रसंगी भारतीय योग संस्थेचे सर्व योगा साधक,शाळेचे प्रभारी मुख्यध्यापक सुकटेसर कैलास शेळकेसर,तुपेसर ,जाधव सर ,रासकर सर,पठाण मॅडम सोनवणे मामा,गणेश कोरके, गिरीष खवले, संतोष कवाडे आदी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय योग दिनी योग शिक्षकांकडून मिळालेल्या शास्त्रोक्त माहिती आणि प्रात्यक्षिकाने विद्यार्थी शिक्षक व वारी ग्रामस्थ आदी उपस्थितांनी समाधान व्यक्त केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *