आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी बांधील अडीच वर्षात आरोग्य सेवा वाढविण्यावर भर दिला:- ना. आशुतोष काळे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- मतदार संघातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी आरोग्यसेवा सुधारावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहे. आरोग्याच्या तक्रारीकडे नागरिकांनी गांभीर्याने पाहावे.गाफीलपणा महागात पडू शकतो. कोणत्याही आजारावर वेळेत योग्य उपचार घेतल्यास निश्चितपणे त्या आजारावर मात करता येते. आपले आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी बांधील असून अडीच वर्षात आरोग्य सेवा वाढविण्यावर भर दिला आहे असे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे गुरुवार (दि.२१) रोजी भव्य मोफत आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उदघाटन ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, मतदार संघाची आरोग्यसेवा वाढली पाहिजे त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु होते. मागील दोन वर्ष आपण सर्वांनी कोरोनाच्या बाबतीत जे अनुभवलं त्यामुळे आरोग्य सेवा किती गरजेची आहे हे दिसून आले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत आजाराची सखोल माहिती नसतांना देखील आरोग्य विभागाने अनुभवाच्या जोरावर पहिली लाट परतवून परिस्थिती नियंत्रणात आणली. दुसऱ्या लाटेत देखील कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनची सुविधा निर्माण करून ५० बेडचे स्वतंत्र कोविड वार्ड निर्माण केला आहे. ऑक्सिजन प्लांट उभारला व तालुका ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण केला आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात कोपरगाव ग्रामीण रुग्णालय उभारून कोपरगावला १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी प्रस्ताव दाखल केला होता. त्यासाठी केलेल्या पाठ्पुराव्यातून ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होवून उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी मिळाली असून नवीन इमारतीच्या कामाची लवकरच निविदा प्रसिद्ध होणार आहे.

ग्रामीण भागात देखील आरोग्यसेवा वाढावी यासाठी प्रयत्नशील असून माहेगाव देशमुख येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. तिळवणी येथे देखील प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली आहे. श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईनाथ रुग्णालय व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांना चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी माझे प्रयत्न राहतील.आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाचे असे उपक्रम सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त असून या आरोग्य मेळाव्यामध्ये नागरिकांना मोफत डिजिटल हेल्थ आय.डी. व आयुष्यमान भारत कार्ड काढून दिले जाणार असून सर्व आजारांची मोफत तपासणी केली जाणार आहे याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ना.आशुतोष काळे यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, डॉ. गोवर्धन सांगळे, डॉ. अजय गर्जे, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, डॉ. हेमंत राठी, डॉ. संजय महाजन, डॉ. संजय उंबरकर, डॉ. रमेश कोठारी, डॉ. दीपाली आचार्य, डॉ. अनिल उंडे, डॉ. आतिष काळे, डॉ. कुणाल घायतडकर, डॉ. विजय क्षीरसागर, डॉ. अमित नाईकवाडे, डॉ. योगेश लाडे, डॉ. मंजुषा गायकवाड, डॉ. सायली भागरे, डॉ. तेजश्री चव्हाण, डॉ. शेळके, डॉ. पूजा गर्जे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन चांदगुडे, माजी उपसभापती अर्जुनराव काळे, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, हाजी मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, संतोष चवंडके, रमेश गवळी, दिनकर खरे, फकीर कुरेशी, जावेद शेख, चंद्रशेखर म्हस्के, प्रशांत वाबळे, अशोक आव्हाटे, वाल्मिक लहिरे, नारायण लांडगे, आकाश डागा, शुभम लासुरे, सचिन जोशी, शैलेश साबळे, सचिन गवारे, विकास बेंद्रे, शंकर घोडेराव, लक्ष्मण भाटे, आकाश सोळसे, अल्ताफ अत्तार, संदीप जाधव आदींसह नागरिक उपस्थित होते.

फोटो ओळ – भव्य मोफत आरोग्य मेळाव्याचे उदघाटन प्रसंगी बोलतांना ना. आशुतोष काळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *