
कोपरगाव प्रतिनिधी
(देवळाली प्रवरा):-
प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रयत्नांतून देवळाली प्रवरा येथील अनाथ मुलगी आरती निलेश पंडित हिला अंतोदय योजनेतून कायमचे मोफत धान्य सुरू करुन देवून त्या अनाथ मुलीचा उदरनिर्वाहाचा प्रश्न कायमचा सोडविला असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी सांगितले.
देवळाली प्रवरा येथील रेशन धान्य दुकानातून पहिल्यांदा आरतीला धान्य वितरण प्रसंगी ढूस बोलत होते. प्रसंगी प्रहार श्रमिक सेवा संघाचे सचिव बाळासाहेब कराळे, प्रहार जनशक्ती पक्षाचे देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष किरण पंडित, उपाध्यक्ष अशोक देशमुख व बहुसंख्य प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रसंगी पुढे बोलतांना आप्पासाहेब ढूस यांनी सांगितले की, आरती पंडित हि अनाथ मुलगी उघड्यावर राहत असल्याचे लक्षात आल्यानंतर जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून प्रहार कडून सर्वप्रथम तिच्या डोक्यावर निवारा देण्याचे काम करणेत आले. तदनंतर महसुल प्रशासनाकडून तिला अंतोदय रेशन कार्ड मिळवुन देणेत आले. व आज तिला पहिल्यांदा त्या रेशन कार्ड वर अंतोदय योजनेतून मिळणारे मोफत धान्य वितरण सुरू करून तिच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न कायमचा सोडविला आहे.
रमाई आवास योजनेतून तिला हक्काचे पक्के घर मिळवुन देनेसाठीं प्रहार जनशक्ती पक्ष प्रयत्नशील असून लवकरच तिला स्वतःची जागा व घर देणेत येइल. त्याचबरोबर देवळाली प्रवरा हद्दीतील कोणीही बेघर राहू नये म्हणुन प्रसादनगर येथील दागडखान जागेत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून देवळाली प्रवरा हद्दीतील भटक्या विमुक्त जाती जमातीच्या नागरिकांसाठी सुद्धा मोफत घर देनेसाठी आम्ही प्रयत्नशील असून ते कामही लवकरच सुरू होईल असे ढूस यांनी शेवटी बोलतांना सांगितले.
