काकडी परिसरातील नागरिकांचा सध्याचा पाण्यासाठी होणारा त्रास भविष्यात कमी होइल:- कानिफ गुंजाळ…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
जल जीवन मिशन ग्रामपंचायत पाणीटंचाई ग्रामस्थांना आनंदाची बातमी असुन या वर्षी विहिरीचे पाणी कमी पडल्याने तसेच मोटर जळाल्याने मागील काही दिवस काही ग्रामस्थांना पाणी न आल्याने त्रास सहन करावा लागला.काकडी /मल्हारवाडी ग्रामपंचायतच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे.तसेच मोटर व बाकीचे सर्व काम झाले असून काल आणि आज ग्रामपंचायत कर्मचारी हे जलद गतीने काम करत आहे, संपूर्ण काम झाले आहे, शेततळ्यात पण मोटर सोडली आहे .त्याचबरोबर आनंदाची बातमी म्हणजे,, आजपर्यंत पाण्याबद्दल नागरिकांना जो त्रास सहन करावा लागला यापुढे कधीही भविष्यात परत असा त्रास सहन करण्याची गरज पडणार नाही कारण,आपल्या काकडी / मल्हारवाडी ग्रामपंचायतला अडीच कोटी रुपयांची जल जीवन मिशन पाणी योजना मंजूर झाली असून. (घरोघरी नळ, वाड्यावस्त्या सह..) काम प्रगतीपथावर चालू झाले आहे.यापुढे भविष्यात कधीही पाण्याबद्दल ग्रामस्थांना त्रास होणार नाही असे दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात कानिफ सोपान गुंजाळ यांनी म्हटले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *