संजीवनी करतेय ग्रामिण विध्यार्थ्यांचे नोकरदार होण्याचे स्वप्न पुर्ण…
कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी के.बी.पी.पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने आयोजीत केलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत कमिन्स इंडिया लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीने संजीवनीच्या १३ नवोदित अभियंत्यांची ट्रेनी इंजिनिअर पदावर निवड केली असुन संजीवनी मार्फत अनेक ग्रामिण भागातील विध्यार्थ्यांचे नोकरदार होण्याचे स्वप्न पुर्ण होत आहेे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
श्री कोल्हे यांनी पत्रकात म्हटले आहे की मागील अनेक वर्षांपासून कमिन्स मार्फत संजीवनीच्या विध्यार्थ्यांची पहिल्या पसंतीने निवड केली जाते. अगोदर निवड झालेले व कंपनीत कार्यरत असलेले संजीवनीचे माजी विध्यार्थी तेथे आस्थेने, जबाबदारीने कर्तव्य निभावतात. त्यांचे उत्तम करीअर घडविणसाठी ते नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून कंपनीच्या वृध्दीसाठी प्रयत्न करतात. या सर्व बाबींचे धडे त्यांना संजीवनी मधुनच मिळाल्याने कंपनी सुध्दा नव्याने इंजिनिअर्सची भरती करताना संजीवनीला प्रथम प्राधान्य देते. या कपंनीत कार्यरत असलेल्या अनेक माजी विध्यार्थ्यांना कमिन्सच्या जगभर पसरलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्येही काम करण्याची संधी मिळत आहे.
निवड झालेल्या विध्यार्थ्यांमध्ये ऋषिकेश नितिन सोणवने, सनी कुमार, मीता अनिल बागुल, अक्षय भास्कर होन,सोहम महेश जोशी , प्रसाद अशोक गव्हाणे, संकेत सोमनाथ शिपलकर, सानिया जाकिर अत्तार, दिक्षिता सुनिल कानडे, पंकज कुमार,प्रेम कुमार, स्नेहल संजय शिंदे व सुप्रिया राजेंद्र चंदाणे यांचा समावेश आहे.
आपल्या पाल्यांना नोकरी मिळाल्याने विध्यार्थ्यांच्या पालकांनी संजीवनीच्या व्यवस्थानाप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक कै. शंकरराव कोल्हे यांनी ज्या हेतुने ४० वर्षांपूर्वी संजीवनी पाॅलीटेक्निकची स्थापना केली तो हेतु पुर्णपणे सफल होत आहे. अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी सर्व यशस्वी विध्यार्थी व त्यांच्या भाग्यवान पालकांचे अभिनंदन केले तसेच श्री अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विध्यार्थ्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, टर्निंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आय. के. सय्यद, विभाग प्रमुख, आदी उपस्थित होते.

फोटो ओळी: संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांचे समवेत कमिन्स इंडिया कंपनीत निवड झालेले संजीवनी पाॅलीटेक्निकचे विध्यार्थी. यावेळी प्राचार्य मिरीकर यांचे सह विभाग प्रमुख उपस्थित होते.
