संजीवनी महिला बचत गटाच्या वतीने घरगुती गौरी आणि गणपती सजावट स्पर्धा,, स्पर्धकांसाठी अनेक आकर्षक पारितोषिके जाहीर…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
भाजपच्या प्रदेश सचिव, संजीवनी महिला बचतगटाच्या संस्थापक अध्यक्षा, तत्कालीन आमदार स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी महिला बचत गटाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदा गणेशोत्सवानिमित्त घरगुती गौरी गणपती सजावट आणि घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यात घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेसाठी प्रथम ११ हजार रुपये, द्वितीय ७ हजार रुपये आणि तृतीय ५ हजार रुपये पारितोषिक ठेवण्यात आले असून, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच घरगुती गणपती सजावट स्पर्धेसाठी ११ हजार रुपयांचे प्रथम, ७ हजार रुपयांचे द्वितीय आणि ५ हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक ठेवण्यात आले आहे. याशिवाय सहभागी स्पर्धकांना आकर्षक पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.या दोन्ही स्पर्धा कोपरगाव शहरापुरत्या मर्यादित असून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाचे प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तर संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि युवा नेते विवेकभैया बिपीनदादा कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आल्या आहेत तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात भाग घ्यावा असे आवाहन कोपरगाव तालुका स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षi सौ. रेणुका विवेक कोल्हे यांनी केले आहे
संजीवनी महिला बचत गटाच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात. मागील दोन वर्षे कोरोना महामारी आणि शासनाने घातलेल्या निर्बंधामुळे सण, उत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरे करण्यावर मर्यादा आल्या होत्या. दोन वर्षांनंतर यंदा गणेशोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा केला जात आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी मोठ्या उत्साहात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणेशोत्सव
आणि गौरी (महालक्ष्मी) सणानिमित्त अनेक गणेशभक्त आणि महिला आपल्या घरात प्रतिष्ठापना केलेल्या गणपती मूर्तीसमोर तसेच गौरी (महालक्ष्मी) समोर मोठ्या प्रमाणात आकर्षक आरास (सजावट) करतात. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा आयोजनाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.
घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपले संपूर्ण नाव आणि पत्त्यासह घरगुती गौरी गणपती सजावटीचे फोटो येत्या ६ सप्टेंबरपर्यंत तसेच घरगुती गणपती सजावट स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी घरगुती गणपतीसमोर केलेल्या सजावटीचे फोटो आपले संपूर्ण नाव आणि पत्त्यासह ७ सप्टेंबरपर्यंत ९७०३७४६४७६ या व्हॉटसअॅप नंबरवर पाठवावेत. घरगुती गौरी आणि गणपतीसमोर केलेली सजावट इकोफ्रेंडली असावी. नामांकित व्यक्तींकडून गौरी आणि गणपतीसमोर केलेल्या सजावटीची पाहणी व परीक्षण केले जाणार आहे.
या दोन्ही स्पर्धांचा निकाल स्पर्धेनंतर जाहीर करून विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. तरी कोपरगाव शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *