
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहराच्या लगत वाहत असणाऱ्या गोदावरी नदी किनारी असलेले राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या नावाने असणाऱ्या मोनगिरी सेतू च्या डाव्या बाजूला गावात जाताना,श्री स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूने /लगत खूप लांब असा घाट व त्याला नदीपात्राच्या आतपर्यंत पायऱ्या नगरपालिकेने बांधाव्यात / नवीन घाट बांधावा.
पावसाळ्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा गोदावरी नदीला पाणी आल्यानंतर ,शहरातील महिला माता भगिनी मोठ्या प्रमाणात गोदावरी मातेची पूजा करायला येतात आंघोळ करायला येतात.कोणी नुसते दर्शन घेऊन पायावर पाणी घेतात.
त्याचप्रमाणे गणपती विसर्जनाच्या वेळी लोकांना जागा राहत नाही गणपती विसर्जन करण्यासाठी .कारण नदीला पूर असतो आणि कधी खूप खोल पाणी कमी असते .लोकांच्या गणपती बाप्पाला विसर्जनाच्या भावना या नदीतच वाहत्या पाण्यात बाप्पाचे विसर्जन झालं पाहिजे असे प्रत्येक नागरिकाची व गणपती बाप्पाच्या भक्ताची बालगोपालांची इच्छा असते.
शहरात नदीकिनारी स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूला मोठ्या प्रमाणात सुंदर असा घाट होईल अशी जागा आहे .त्यामुळे जनतेच्या धार्मिक भावनांचा विचार करून तसेच पौर्णिमा ,अमावस्या ,प्रदोष, श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात लोक त्या ठिकाणी आंघोळीला येतात तसेच शिर्डीलाही जाताना कोपरगाव मधून कावड भरून लोक पाई साईबाबांना जातात.


यासाठी नगरपालिकेने स्वामी समर्थ मदिराचे गुरू माऊली यांची परवानगी घेऊन तात्काळ सुंदर असा पक्का घाट व त्याला सुरक्षित असे संरक्षण कठडे खालपर्यंत घ्यावेत करावेत बांधावेत ,जेणेकरून कोणी वाहून जाणार नाही अशा स्वरूपाचे करता येते ,ते करावे ,त्याचे नियोजन करावे व तात्काळ हे काम चालू करावे ही भक्तांचे वतीने व नगरपालिकेच्या शहराच्या नागरिकांचे वतीने नगरपालिकेला विनंती मागणी .
कोपरगाव शहराला ऐतिहासिक असे महत्त्व प्राप्त आहे .कोपरगाव शहरात बेट भागात शुक्राचार्य भगवान व कचेश्वर भगवान यांचे मंदिर आहे. त्र्यंबकेश्वर प्रमाणे कचेश्वर मंदिरात सर्व धार्मिक विधी वर्षभर होऊ शकतात असे मानण्यात येते ,असे सांगण्यात येते .इतके महत्त्व या स्थानाला आहे.विधी केल्यानंतर बराच वेळा नदीमध्ये स्नान करावे लागते. विधी पूजा झाल्यानंतर स्नानासाठी योग्य अशी जागा अंघोळ करण्यासाठी नसल्याने ही विधी ची परंपरा लोकपावत चाललेली आहे. तरी आपला हा सांस्कृतिक वसा टिकण्यासाठी व पुन्हा इथे पूजाअर्चा सुरू होण्यासाठी नदीच्या विरुद्ध बाजूने शुक्राचार्य घाट करण्यात आलेला आहे त्याहून चांगला मोठा सुरक्षित घाट होणे खूप महत्त्वाचा आहे.
यामुळेही कोपरगाव शहरांमध्ये यातील ऐतिहासिक मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी व नदीत अंघोळ करण्यासाठी ,पूजा करण्यासाठी लोकांची वरदळ वाढेल व छोट्या छोट्या व्यवसायिकांना व पुरोहितांनाही याचा उपयोग होईल .
कुंभारी येथे राघवेश्वरानंद महाराज महाराज यांनीही नदीकाठी छानसा घाट बांधलेला आहे .बाबांची ही इच्छा आहे की नदीकाठी स्वामी समर्थ मंदिराला खेटून असं घाट व्हावा. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तिथे मंदिराला भेट देऊन तिथल्या घाटाची पाहणी करावी. व कोपरगावकरांसाठी लवकर हा काँक्रीट चा आरसीसी घाट बांधून व त्यावर दगडी पायऱ्या करून करावा…
माता अहिल्याबाई होळकर यांनी ज्याप्रमाणे प्रत्येक संपूर्ण भारतातील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या नदीकाठी भाविकांसाठी त्याकाळी मोठमोठे सुंदर असे दगडी घाट बांधले आहेत.याचा आदर्श नगरपालिकेने घ्यावा.
