
कोपरगाव प्रतिनिधी:-
कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब यांनी साऊथ आफ्रिकेतील देशाचे कायमस्वरूपी राष्ट्राध्यक्ष पद , स्वित्झर्लंड मधील प्रगती पथावरील घड्याळ निर्मिती उद्योग, गलेलठ्ठ पगाराच्या सर्वोच्च पदाच्या नोकऱ्या लाथाडून भारतीय शेतकऱ्यांना खंबीर पाठबळ देण्याची पहिल्या मुहूर्तमेढीच्या माध्यमातूनआपल्या मायभुमीत शेतकऱ्यांना कायमस्वरूपी उध्वस्त करणारी सावकार शाही मुळासकट उपटून टाकण्यासाठी प्रथम सहकार चळवळ मजबूतीने साखर उद्योग, सहकारी बँक आणि सहकारी सोसायट्या उभारणी तून रोवली. ग्रामीण जनतेतील अज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून नगर नासिक सह सर्वत्र मोफत शिक्षण स्वप्नंपुर्तीसाठी ग्रामीण महाराष्ट्रात शिक्षणाची द्वारे सताड उघडी केली. एवढ्यात न थांबता कोपरगाव तालुक्यात संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाचे रुपात आरोग्य, उद्योग, यांत्रिक, उद्योग व्यवस्थापन क्षेत्रात जागतिक पातळीवरील अत्याधुनिक अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करून विकसित भारत घडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली.
कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या या कार्याची धुरा जेष्ठ पुत्र नितीन दादा कोल्हे यांनी पंचवीस वर्षांपासून यशस्वीरित्या सांभाळली याकामी त्यांना जेष्ठ कन्या श्रीमती निलिमाताई पवार, संजीवनी ग्रामीण उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन दादा कोल्हे यांचें उत्तम सहकार्य लाभत आहे.
सुदैवाने या कार्यात नितीन दादा कोल्हे यांचे जेष्ठ पुत्र अमितदादा व सुमित कोल्हे, माजी आमदार सौ. स्नेहलता वहिनी साहेब विवेक भैय्या कोल्हे याडबल त्रिवेणी पर्वणीबळावर कर्मयोगाने संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाचे शैक्षणिक कार्याची महतीच नव्हे कर्तबगारीची चुणूक आणि संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाची गरज जगाला किती हे प्रत्ययास आणून दिली.
जागतिक पातळीवरील अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित कार्याने जगातील नामवंत शिक्षण समूहांशी जोडले गेले. याच यशस्वी कामगिरी बळावर केंद्र सरकारने संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाच्या विविध प्रकारच्या प्रकल्पसमूहास नविन स्वतंत्र ग्रामीण भागातील विद्यापीठ म्हणून मान्यता दिली आहे.
कोपरगाव तालुक्याला कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या सह तीन कोल्हे यांच्या पिढ्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या अद्वितीय कार्याने निश्चितच कायमस्वरूपी नवसंजीवनी लाभली आहे.
अशा कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या तीन पिढ्यांतील संजीवक शिक्षण सेवक नितीन दादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व कोल्हे कुटुंबियांना ईश्वराने सर्व प्रकारची सुखसमृद्धी आरोग्य उत्तम स्वरूपात मिळावी अशी प्रभु कडे विनम्र प्रार्थना !!!
— जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल कोपरगांव
