आर जे एस होमिओपॅथी मेडिकल विद्यालयाचा ७४ टक्के निकाल…

Uncategorized

आर जे एस होमिओपॅथी मेडिकल विद्यालयाचा ७४ टक्के निकाल…

कोपरगाव प्रतिनीधी:- कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा फाटा येथे असलेल्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या पहिल्या वर्षाचा निकाल लागला असून यात १०० विद्यार्थ्यांपैकी ७४ विद्यार्थी घवघवीत यश मिळवून पास झाले विद्यालयाचा एकूण निकाल ७४ टक्के लागला.यात प्रथम क्रमांक मयुरी शेळके ७७ टक्के,द्वितीय क्रमांक निकिता जाधव ७२ टक्के,तृतीय क्रमांक स्वप्नाली गलांडे ६८ टक्के,अस्मिता कदम ६८ टक्के, अरुफा अन्सारी ६८ टक्के या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक टक्केवारीत प्रथम निकाल कोपरगाव येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी होमीओपॅथी मेडिकल विद्यालयाचा लागला आहे.केंद्रीय होमीओपॅथी संशोधन अनुसंधान (CCRH) ने पुढील वर्षासाठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी होमिओपॅथी मेडिकल विद्यालयासोबत होमिओपॅथी क्षेत्रात संशोधन करण्यासाठी संमती दिली आहे.ही विशेष बाब आहे.राष्ट्रसंत जनार्दन स्वामी होमीओपॅथी मेडिकल विद्यालय नेहमी नवनवीन सेमिनार,वेबिनार इत्यादी व्यासपीठ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यास सदैव पुढाकार घेते.या यशामध्ये सर्व शिक्षकांचे मोलाचे योगदान होते.या घवघवीत यशाबद्दल राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष चागदेव कातकडे ,सचिव प्रसाद कातकडे, होमीओपॅथी विद्यालयाच्या प्राचार्या सावनी यरनाळकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *