संजीवनी पाॅलीटेक्निकला मेंटर संस्थेचा दर्जा:-श्री अमित कोल्हे….

अहमदनगर

एआयसीटीई कडून संजीवनीची दखल…

कोपरगांव प्रतिनिधी:-

संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निक ही सन २०१६ पासुन सलग एन.बी.ए. मानांकन प्राप्त संस्था असुन अशा प्रकारच्या संस्था हाताच बोटावर मोजण्या इतक्याच आहे. संजीवनी सारखीच शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा इतर संस्थांनी राखावा, अशा संस्थांना मार्गदर्शन व्हावे, यासाठी आखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद , नवी दिल्लीने (एआयसीटीई) संजीवनी पाॅलीटेक्निकडुन विहित नमुन्यात प्रस्ताव मागुन त्याची दुरभाष्य प्रणालीच्या माध्यमातुन सादरीकरण घेवुन संजीवनीला आता इतर पाॅलीटेक्निकला मार्गदर्शन करण्यासाठी ‘मेंटर’ संस्था म्हणुन दर्जा दिला असुन संजीवनीच्या दर्जा व गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे, पाॅलीटेक्निक संस्थांमधिल मेंटर दर्जा प्राप्त संजीवनी ही एकमेव संस्था आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
या अभुतपूर्व यशाबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री श्री शंकरराव कोल्हे, संस्थेचे कार्याध्यक्ष यांनी समाधान व्यक्त करून सर्वांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पत्रकात श्री कोल्हे यांनी म्हटले आहे की देशात एआयसीटीईच्या अखत्यारीत सरकारी व खाजगी मिळुन १०,४०० मान्यता प्राप्त तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. पैकी फक्त ९२२ संस्थांना एनबीए मानांकन प्राप्त आहे. या ९२२ संस्थांपैकी संपुर्ण भारतात फेब्रुवारी अखेरच्या आकडेवारीनुसार फक्त ४० संस्थांना ‘मेंटर’ संस्था म्हणुन दर्जा प्राप्त आहे. त्यात महाराष्ट्रातील आत्तापर्यंत फक्त ३ संस्थांचा समावेश होता, अलिकडच्या या संदर्भातील अद्ययावत माहितीनुसार नुसार संजीवनी पाॅलीटेक्निक ही राज्यातील ४ थी मेंटर संस्था म्हणुन ओळखल्या जाणार आहे.
एआयसीटीईच्या सर्वेक्षणानुसार अनेक तांत्रिक शिक्षण संस्थांची गुणवत्ता व दर्जा समाधानकारक नाही. त्यामुळे नवोदित अभियंत्यांच्या रोजगारभिमुकतेवर वाईट परीणाम होत आहे. विध्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळुन एआयसीटीच्या मार्गदर्शक तत्वांनुसारच अध्यापन व अध्ययन व्हावे, विध्यार्थ्यांमध्ये विविध मुल्यांची रूजवण व्हावी, शिक्षकांनी आपापल्या क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान आत्मसात करावे, इत्यादी बाबींच्या मार्गदर्शनासाठी ज्या संस्थांमध्ये या सर्व बाबींचा अवलंब केला जातो अशा संस्थांना सर्व निकष पुर्ण केल्यावर इतर संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी निवडक संस्थांना मेंटर दर्जा देवुन अशा संस्थांनी इतर संस्थाना बरोबर घेवुन दर्जा व गुणवत्तेच्या प्रवाहात आणन्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यात संजीवनीला अग्रक्रम देण्यात आला आहे, ही संजीवनच्या दृश्टीने एक ग्रामिण भागातील संस्था म्हणुन मोठी उपलब्धी आहे.
मेंटर संस्था योजने अंतर्गत संजीवनी पासुन २०० किमी त्रिजेच्या आतिल तांत्रिक विशेषतः पाॅलीटेक्निक संस्थांना सहभागी करायचे आहे. यानुसार संजीवनीने मार्गदर्शन करण्यासाठी सुरूवात केली असुन एआयसीटीने निकषांनुसार २०० किमी आतिल ७ संस्थांची जबाबदारी संजीवनीवर सोपविली आहे. संजीवनीच्या मार्गदर्शनाखाली आता या संस्थांना एनबीए मानांकन प्राप्त होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. एआयसीटीईच्या धोरणानुसार २०२२ पर्यंत देशातील सर्व संस्थांनी एनबीए मानांकन प्राप्त करावे, असे अपेक्षित आहे. त्यानंतर ज्या संस्था एनबीए मानांकन प्राप्त करणार नाही, अशा संस्थांची मान्यता रद्ध करण्यात येईल, असे एआयसीटीने स्पष्ट केले आहे.
या योजने अंतर्गत संजीवनी पाॅलीटेक्निकच्या सभागृहात प्राचार्य ए. आर. मिरीकर, योजनेच्या मुख्य समन्वयक डाॅ. कल्पना जोशी , सर्व विभाग प्रमुख, लाभार्थी सात पाॅलीटेक्निकचे प्राचार्य व त्यांचे प्रतिनिधी यांच्यात योजनेची पुर्तता करण्या संदर्भात कोविड १९ चे मार्गदर्शक तत्वे पाळून परस्पर सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, असे श्री कोल्हे यांनी शेवटी म्हटले आहे.

फोटो ओळीः संजीवनी पाॅलीटेक्निकला एआयसीटीई कडून प्राप्त झालेल्या मेंटर योजने अंतर्गत इतर संस्थांचे प्राचार्य व प्रतिनिधीं बरोबर परस्पर सामंजस्य कराराच्या फाईल्स अदान प्रदान करताना प्राचार्य मिरीकर, मुख्य समन्वयक डाॅ. जोशी आणि संजीवनीचे मार्गदर्शक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *