कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील शेतकऱ्यांचे पशुधन चोरी करणाऱ्या आरोपींना पोलीसांनी केले 04 तासात जेरबंद…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक 13/03/2023 रोजी 22/00 ते दिनांक 14/03/2023 रोजी 02/30 वा. दरम्यान कोपरगाव तालुका पोलीस हद्दीतील रवंदा गावचे शिवारातुन शेतकरी सौ. शालिनी संजय कदम वय 47 वर्षे रा.रवंदा ता कोपरगाव मालकीची तांबडया रंगाची शेळी (पशुधन) 10,000/-रु. कि. कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. त्याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाणे गु.र.नन. 132/2023 भा.द.वि.क. 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथील पोलीस पथकाकडुन सुरु होता.
सदर गुन्हयाचा तपास सुरु असतांना श्री वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, तिन अनोळखी इसम हे एका डिस्कव्हर मो. सायकलला उभी करुन तिला तांबड्या रंगाची शेळी बांधलेली आहे व त्यांचे मो. सायकलमधील पेट्रोल संपल्याने ते रोडवर उभे आहेत वगैरे मजकुरची बातमी मिळाल्याने सदर बातमीची खात्री करण्यासाठी सफौ/सुरेश गागरे, पोकॉ/युवराज खुळे व पोकॉ/ जयदिप गवारे चालक पोकों/चंद्रकांत मेढे यांना सरकारी वाहनांसह रवाना केले. पोलीस पथक हे टोलनाक्याकडुन नाटेगावकडे जात असताना त्यांना नमुद बातमीतील हकीगतीप्रमाणे तिन ईसम मो. सायकल व शेळी सह मिळुन आले त्यांना ताब्यात घेवुन नाव गाव पत्ते विचारले असता, त्यांनी त्यांची नावे 1)लक्ष्मण लहु पवार वय 24 वर्षे (2) सागर राजेंद्र मोरे वय 18 वर्षे (3)भिमा रामदास मोरे वय 18 वर्षे सर्व रा. निमगाव मढ़ ता. येवला जि.नाशिक अशी सांगितली त्यांचेकडे मिळुन आलेल्या तांबडया रंगाचे शेळीबाबत (पशुधन) विश्वासात घेवुन विचारपुस करता, त्यांनी सदरची शेळी रवंदा गावचे शिवारातुन रात्रीच चोरुन आनल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींकडुन पोलीसांनी 45,000/- रु. कि. मो.सायकल व चोरीस गेलेली 10,000/- रु.कि. शेळी (पशुधन) असा एकुण 55,000/- रु. मुददेमाल हस्तगत केला आहे. शेतकऱ्यांचे पशुधन चोरी सारखा गंभीर गुन्हा केवळ 04 तासात उघडकीस आनदा आहे.
सदरची कौतुकास्पद कामगीरी मा. पोलीस अधिक्षक, श्री राकेश ओला सो, मा. अपर पोलीस अधिक्षक सो स्वाती भोर मँडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो श्री संजय सातव सो यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे श्री वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक, स.फौ. सुरेश गागरे, पोहेकॉ / संदिप बोटे, पोकों/युवराज खुळे, पोकॉ/ जयदिप गवारे व चालक पोकों/चंद्रकांत मेढे यांनी केली आहे. सदर आरोपींनी अशाच प्रकारचे पशुधन चोरीचे गुन्हे केले आहे अगर कसे या बाबत पुढील तपास पोलीस कसोशीने करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *