कोपरगाव मतदार संघातील २५ किलोमीटर रस्त्यांसाठी, २३.२७ कोटीची प्रशासकीय मान्यता:- आ. आशुतोष काळे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील प्रलंबित असलेल्या वारी-कान्हेगाव ते संवत्सर रस्ता, प्र.जि.मा.८४ ते पोहेगाव-देर्डे चांदवड ते कुंभारी रस्ता व ओगदी ते पढेगाव या महत्वाच्या एकूण २५ किलोमीटर रस्त्यांसाठी २३.२७ कोटीची प्रशाकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मागील साडे तीन वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी आणून खराब रस्त्यांना वैतागलेल्या नागरिकांना दिलासा दिला आहे. ज्या रस्त्यांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळणे बाकी होते त्यासाठी लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता मिळवून या रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरूच होता.त्या पाठ्पुराव्यातून वारी-कान्हेगाव ते संवत्सर रस्ता (१०.७४ कोटी), प्र.जि.मा.८४ ते पोहेगाव-देर्डे चांदवड ते कुंभारी रस्ता (७.८१ कोटी) व ओगदी ते पढेगाव (४.७२ कोटी) या दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या एकूण २५ किलोमीटर रस्त्यांसाठी २३.२७ कोटीची प्रशाकीय मान्यता मिळाली आहे. लवकरच या रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रक्रिया सुरु होवून कामाच्या निविदा देखील प्रसिद्ध होतील व रस्त्याचे कामास प्रारंभ होणार आहे.
त्यामुळे मागील अनेक वर्षापासून खराब रस्त्यांचा त्रास सहन करीत असलेल्या नागरिकांची डोकेदुखी दूर होणार आहे. कोपरगाव शहरासह कोपरगाव मतदार संघाच्या ग्रामीण भागातील बहुतांश रस्ते विकसित झाले असून अनेक रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. प्रत्येक खराब रस्त्यांना निधी देवून नागरिकांनी आजवर सोसलेल्या त्रासातून त्यांना मुक्त करायचे असून उर्वरित रस्त्यांसाठी देखील निधी प्राप्त करून या रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. वरील महत्वाच्या रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे नागरिकांना होत असलेला त्रास लवकरच संपुष्टात येणार असल्यामुळे वाहन चालक व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून सबंधित गावातील नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *