प्रिसीजन मेडिकेअर सर्व्हिसेस चा विजयादशमीच्या मुहूर्तावर उद्घाटन संपन्न:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
गोदाम गल्ली येथील बंब प्लाझा मधे नव्याने सुरू झालेल्या, प्रिसीजन मेडिकेअर सर्व्हिसेस या शाखेचा शुभारंभ विजया दशमीच्या मुहूर्तावर राष्ट्र संत जनार्दन स्वामी समाधिस्थान येथील महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.
महेश महाले यांनी वैद्यकीय साधने पुरवठा, विक्री व दुरूस्ती सेवेसाठी कोपरगाव शहरात दालन सुरू केले.
शुभारंभ प्रसंगी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी जेष्ठ साहित्यिक डॉ दादासाहेब गलांडे, छायाचित्रकार हेमचंद्र भवर, सतीश गंगवाल, विजय गंगवाल, डॉ. राजेश माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रिसीजन मेडिकेअर सर्व्हिसेस या शाखेमुळे अनेकांना लाभ होईल, आपल्या गावात वैद्यकीय साधने पुरवठा होईल असे विचार महंत रमेशगिरीजी महाराज यांनी व्यक्त केले.


	

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *