स्व.शंकरराव कोल्हे ही व्यक्ती नसुन अभ्यासू प्रेरणा होती:- राजेंद्र सोनवणे, माजी नगराध्यक्ष…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
इंदिरा मिठाई
कोपरगांव बेट ही गुरू शुक्राचार्यांची भूमी. या भूमीत त्यांनी संजीवनी विद्येच्या सामर्थ्यावर अद्भूत गोष्टी करून दाखविल्या. तोच ध्यास माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी घेतला आणि १९६० मध्ये संजीवनी सहकारी साखर कारखाना स्थापन करून त्या माध्यमांतून परिसराचा कायापालट घडवुन आणला.
शंकरराव कोल्हे ही व्यक्ती नसुन अभ्यासू प्रेरणा होती. आमचे वडील स्व. दत्तात्रय कचेश्वर सोनवणे हे माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचे विश्वासू सहकारी त्यांना गोर गरीबांच्या कार्यात नेहमीच आनंद वाटे त्यासाठी त्यांनी दिवाळसणासाठी हातावर प्रपंच असणा-या वर्गाला दिवाळीचे लाडू, करंजी, शंकरपाळे, गोडधोड फराळ मिळाला पाहिजे ही कल्पना मनांत ठेवुन बाळासाहेब आढाव यांना सोबत घेत शंकरराव कोल्हे यांच्या समोर फराळ तयार करण्याची कल्पना सुचविली.
ती माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ना नफा ना तोटा या तत्वावर इंदिरा मिठाई म्हणून नावारूपास आणली आणि त्यामाध्यमांतून गरीब घटकांचा दिवाळसण आनंदात साजरा केला. त्यांच्यासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर लाडू करंजी, चकली, शंकरपाळे, शेव, चिवडा, खुरमा, आदि वस्तु अत्यंत माफक दरांत तयार करून दिल्या ती आठवण आजही कायम आहे, त्यांची दुसरी पिढीही यासाठी मदत करते.
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्यामुळेच आपल्याला कोपरगांव शहराचे नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. अल्पसंख्याक घटकाला सोबत घेत त्यांनी कित्येकवेळा विरोधकावर विजय मिळविला असे नेतृत्व दैदिप्यमान होते. त्यांच्या ऋणांत राहुन शब्दप्रपंचाला विराम देतो.
राजेंद्र सोनवणे, माजी नगराध्यक्ष. कोपरगांव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *