सामाजिक कार्यातील माणसे अजरामर होतात !​उत्तमराव माने : स्व. राहुल टेके यांच्या स्मृतींना ‘सेवा यज्ञा’ने अभिवादन;१०५ रुग्णांची नेत्रतपासणी…

Uncategorized

​कोपरगाव प्रतिनिधी : “माणसे त्यांच्या शरीराने नाही, तर त्यांच्या कार्याने अजरामर होतात. दिवंगत ग्रामपंचायत सदस्य राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील यांनी अल्पायुष्यात जे सामाजिक कार्य केले, त्याचा वारसा आज त्यांचे चॅरिटेबल ट्रस्ट समर्थपणे पुढे चालवत आहे. गरजूंच्या डोळ्यांत प्रकाशाची नवी पहाट आणणारे हे शिबिर खऱ्या अर्थाने दादांना दिलेली मोठी आदरांजली आहे,” असे गौरवोद्गार गोदावरी दूध संघाचे माजी संचालक व घोयेगावचे माजी सरपंच उत्तमराव माने पाटील यांनी काढले.
​स्व. राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ‘राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट (वारी)’ आणि ‘तुलसी आय हॉस्पिटल (नाशिक)’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत चष्मे वाटप शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके पाटील होते.

या शिबिरात वारी व परिसरातील एकूण १०५ रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी ९ रुग्णांची निवड मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी करण्यात आली असून, ३४ रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तुलसी आय हॉस्पिटलचे डॉ. तुषार भाकरे, डॉ. श्रीकांत सुरळकर, समन्वयक कैलास भड व टीमने रुग्णांची तपासणी केली.
​ या प्रेरणादायी सोहळ्याला जालना येथील मधुकर शिंदे, अशोक जुये, राम शेजुळ, कोपरगाव बाजार समितीचे माजी सभापती मधुकरराव टेके, उपसरपंच विजय गायकवाड, विद्यमान संचालक प्रकाशराव गोर्डे, कान्हेगावचे प्रगतशील शेतकरी रावसाहेब करडे, किसनराव सांगळे, अशोकराव मलिक, डॉ. हिमांशू त्रिवेदी, वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश रासने यांची प्रमुख उपस्थिती होती.
​तसेच नानासाहेब टेके, प्रथम लोकनियुक्त सरपंच सतीशराव कानडे, तान्हाजी थोरमिसे, ग्रा.पं. सदस्य दौलत वाईकर, योगेश झाल्टे, राजेंद्र मुरार, विजय ठाकरे, दिनेश निकम, अनिल निकम, आकाश निळे, अशोकराव बोर्डे, सोमनाथ थोरात, उत्तमराव वाकचौरे, अजीम शेख, सुरज टेके, स्वप्निल टेके, दीपक झाल्टे, बाळू दुशिंग, जनार्दन माळी, पंडित वीर, अण्णा आहेर, संजय कवाडे, पंडित लकारे, ऋषिकेश मलिक, साई मोरे, शुभम जिरे, जनार्दन अवसरमोल, एकलव्य संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य, समन्वयक कैलास भड, स्मिता काबरा, निर्मला भारुड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ट्रस्टचे अध्यक्ष पत्रकार रोहित टेके यांनी यांनी केले तर माजी ग्रामपंचायत सदस्य गोरख टेके यांनी आभार मानले.
दरम्यान दादांच्या स्मृतींना उजाळा देत असतानाच, या सेवाभावी उपक्रमामुळे वारी परिसरातील गरीब व गरजू रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. ट्रस्टच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *