स्व. शंकरराव कोल्हे साहेब छोटया छोटया गोष्टीचीही काळजी घ्यायचे त्यांच्या अफाट सिंचन ज्ञानाचा आपल्याला उपयोग झाला:- पुंडलिक मुरलीधर देव्हारेकाका, सिंचन तज्ञ, सावरकरनगर, नाशिक….

Uncategorized

नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात नोकरी करून सेवानिवृत्त झालो आणि संजीवनीतून माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी फोन केला. काका सध्या काय करता. कारखान्यावर या. त्याप्रमाणे आपण १९९९ मध्ये आलो आणि कारखान्यासह सभासद शेतक-यांच्या तसेच मतदार संघातील नागरिकांच्या पाटपाण्यांच्या अडी अडचणी शंकरराव कोल्हे साहेबांनी समजुन सांगितल्या त्यावर काय उपाय योजना करता येतील म्हणून त्यांनी सांगितलं त्यांच्याबरोबर २०२० सालापर्यंत काम करतांना कुठलीही अडचण आली नाही. सोबतीला माजी कार्यकारी अभियंता सी आर भायभंग आणि कारखान्यांच्या सिव्हील विभागाचे सर्व आजी माजी स्थापत्य अभियंता व सहायक सहकारी होतेच. उर्ध्व गोदावरी खोरे अतितुटीचे असल्याने त्यात पाणी वाढविण्यांसाठी काय उपाय योजना करता येतील यावर शंकरराव कोल्हे साहेबांचा दांडगा अभ्यास. शासन आणि संजीवनी साखर कारखाना मिळून काय मार्ग काढता येईल असं कामकाज चालायचं. मंत्रालयस्तरावर असंख्य बैठका घेतल्या. पाटपाणी व गोदावरी कालव्यांच्या सुधारणा कामात मोठे योगदान देता आले. आठवडयातुन दोन दिवस व्हिजीट ठरलेली असायची त्या दोन दिवसात माझे जेवणांसह राहण्याची सोय त्यांनी विश्रामगृह प्रमुख काशिनाथ वहाडणे यांना समक्ष सांगितली यावरून कोल्हे साहेब छोटया छोटया गोष्टीचीही काळजी घ्यायचे. त्यांच्या अफाट सिंचन ज्ञानाचा आपल्याला उपयोग झाला.
पुंडलिक मुरलीधर देव्हारेकाका,
सिंचन तज्ञ, सावरकरनगर, नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *