देवळाली प्रवरा मधील रेशन कॅम्पची सांगता ; दोन दिवसांत ३०० कूपन चा प्रश्न मार्गी, प्रहारच्या वतीने महसूलचे आभार…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(देवळाली प्रवरा):-
प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागणीवरून व अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ साहेब यांचे आदेशाने आयोजित देवळाली प्रवरा येथील रेशन कार्डच्या कॅम्प मध्ये दोन दिवसात तब्बल ३०० पेक्षा जास्त रेशन कार्डचे प्रश्न मार्गी लागल्याने कॅम्प च्या सांगता समारोह प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राहुरी तहसिल कार्यालय व महसूल प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.
दि. ०३ मार्च रोजी या कॅम्प ची सांगता झाली.. प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने या कॅम्प मध्ये सहभागी झालेल्या नायब तहसीलदार दंडीले मॅडम, तसेच त्यांना मदत करणारे राहुरी तहसिल कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्कल, तलाठी, तसेच रेशन दुकानदार, सेतू कार्यालय कर्मचारी आणि या सर्वांना मदत करणारे प्रहार चे स्वयंसेवक यांचे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन समस्त देवळाली प्रवरा गावातील नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.


प्रसंगी बोलताना प्रहार चे आप्पासाहेब ढूस यांनी सांगितले की, देवळाली प्रवरा शहर खुप मोठे असून त्याची लोकसंख्या जास्तं असल्याने आणि बहुसंख्य नागरीकांच्या कूपनचे खुप प्रश्न प्रलंबित असल्याने दोन दिवसांच्या कॅम्पने सर्व प्रश्न सुटणार नाहीत.. त्यासाठी एकतर आणखी दोन दिवस कॅम्पला मुदतवाढ द्यावी किंवा दहा बारा दिवसांनी पुन्हा कॅम्प द्यावा जेणेकरून सर्व नागरीकांचे प्रश्न मार्गी लागतील.
प्रसंगी बहुसंख्य नागरीकांना लगेच कूपन देण्यात आले तर काहींना दोन दिवसांनी सेतू मध्ये त्यांचे कूपन प्राप्त होणार आहेत.


या कॅम्पच्या सांगता समारोह प्रसंगी नायब तहसीलदार दंडीले मॅडम यांचेसह सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्कल, तलाठी, सेतू कार्यालय कर्मचारी तसेच रेशन दुकान कर्मचारी यांचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आणि प्रहार श्रमिक सेवा संघाचे वतीने आदर सत्कार करुण आभार व्यक्त करण्यात आले.
प्रसंगी प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष तथा प्रहार श्रमिक सेवा संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस, प्रहार श्रमिक सेवा संघाचे सचिव बाळासाहेब कराळे, प्रहार चे देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष किरण पंडित, प्रहार चे राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष शरद वाळूंज, राहुरी फॅक्टरी महीला शहर अध्यक्ष रजनीताई कांबळे, प्रहार श्रमिक सेवा संघाचे देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष नवनाथ चव्हाण, प्रहार राहुरी फॅक्टरी शहर उपाध्यक्ष गणेश भालके, शेतकरी संघटनेचे प्रशांत कराळे, फिरोज शेख आदीसह शेकडो नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *