
कोपरगाव प्रतिनिधी:-
मा सभापती पोर्णिमाताई जगधने यांचे हस्ते आज प्रा आ केंद्र टाकळी ब्राम्हणगाव येथे कोपरगाव तालुक्यातील राष्ट्रीय जंतनाशक मोहीमेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी पं स सदस्य श्रावण आसने, राहुल जगधने उपस्थित होते. बालकांमधील रक्तक्षय कमी करण्यासाठी आपल्या बालकांना जंतनाशक गोळी या मोहिमेत द्यावी असे आवाहन मा सभापती पोर्णिमाताई जगधने यांनी केले. या मोहिमेत कोपरगाव तालुक्यातील १ वर्षे ते १९ वर्ष वयोगटातील ८९३३१ बालकांना जंतनाशक गोळी देण्यात येणार अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते यांनी दिली. तालुक्यात सर्व प्रा आ केंद्र आणि उपकेंद्र येथे मा जि प सदस्य आणि पं स सदस्य यांचे हस्ते उद्घाटन झाले. मा जि प सदस्य राजेश आबा परजने यांनी संवत्सर येथे मोहीमेचे उद्घाटन केले.
