
आपेगांव येथे गणेश मुर्तीची प्राणप्रतिष्ठा ९३ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सोमवारी सांगता…
कोपरगांव प्रतिनिधी:-
सालाबादप्रमाणे याही वर्षी तालुक्यातील आपेगांव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सोमवार २० फेब्रुवारी रोजी गोदाधामचे महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने होत आहे. सप्ताहाचे हे ९३ वे वर्ष आहे. १३ फेब्रुवारी रोजी हभप शिवाजी महाराज भालुरकर यांच्या हस्ते सप्ताहाचा प्रारंभ करण्यांत आला. महाशिवरात्र पर्वकाळाचे औचित्य साधत गांवक-यांनी गणेश मंदिर उभारले असुन त्याची प्राणप्रतिष्ठा धार्मीक कार्यक्रम सुरू करण्यांत आला आहे.
तिळवणी येथील वेदशास्त्र संपन्न आप्पा जोशी गुरूजी यांच्या पौरोहित्याखाली गणेश मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला जात आहे. नेवासा येथील मुर्तीकार धोत्रे यांनी सव्वातीन फुटी अतिशय नयनमनोहर मुर्ती तयार केली आहे.
या अखंड हरिनाम सप्ताहासाठी आपेगांव ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली पंचकोशीतील सर्व भाविक तन मन धनाने या कार्यासाठी पुढाकार घेत आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी महंत रामगिरी महाराजांच्या किर्तन श्रवणाचा सोमवारी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यांत आले आहे.
