
कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक १४/०२/२०२३ ते १६/०२/२०२३ या कालावधीत कोपरगाव नगरपरिषद आणि एम.के.आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालय आणि नगरपरिषद शिक्षण मंडळ कोपरगाव यांचे मार्फत शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.सदर शालेय क्रीडा महोत्सवाची सांगता कार्यक्रमाचे आज दिनांक१६/०२/२०२३ रोजी कोपरगाव नगरपरिषदेचे मा.प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. शांताराम गोसावी साहेबांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा.श्री.वासुदेव देसले साहेब,मा.सभापती न.पा.शिक्षण मंडळ मा.श्री.संदिप वर्पे,भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मा. श्री परागजी संधान, प्रसिध्द उद्योजक मा.श्री.शुशिलशेठ अरोरा, कोपरगाव शहरातील प्रसिध्द उद्योजक मा.राजेशजी ठोळे, कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी मा.श्री.ज्ञानेश्वर चाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.के .आढाव विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री,वानखेडे सर यांनी केले. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी शालेय उपक्रमाचा भाग म्हणून शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते. या शालेय क्रीडा महोत्सवात शहरातील अनेक शाळेचा सहभाग नोंदविला गेला. खो-खो, कब्बडी, लिंबू चमचा इ.मैदानी खेळांचा सहभाग या ठिकाणी केला जातो असे ते म्हणाले.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विध्यार्थ्यांसाठी शालेय शैक्षणिक साहित्यासाठी तसेच क्रीडा महोत्सवात विशेष प्राविण्य मिळविलेल्या विध्यार्थ्यांसाठी ट्रॉफी इ.साहित्याचे वितरण करण्यात आले. अध्यक्षीय मार्गदर्शन करत असतांना मा.प्रशासक तथा मुख्याधिकारी साहेबांनी सदर क्रिडा महोत्सवाच्या आयोजना बाबत कौतुक केले.विद्यार्थ्यांनी शालेय पाठ्यक्रमा बरोबरच खेळही खेळले पाहिजे जेणे करून बुद्धी विकास बरोबरच शारीरिक विकास देखिल तितकाच महत्वाचा असतो असे सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन एम.के.आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालय आणि नगरपरिषद शिक्षण मंडळ कोपरगाव यांचे मार्फत करण्यात आले होते. सूत्र संचलन एम.के.आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाच्या शिक्षिका बोराडे म्यॅडम यांनी केले.कार्यक्रम यशस्स्वीतते साठी एम.के.आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाच्या सर्व शिक्षक ,कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले
( शांताराम गोसावी )
मुख्याधिकारी
कोपरगाव नगरपरिषद, कोपरगाव
