सूर्यतेज वतीने शिवजयंती निमित्ताने चित्रकला स्पर्धेचे आयोजन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
सूर्यतेज संस्था,कोपरगांव वतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत कोपरगाव तालुका कलाशिक्षक संघ,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बाल रंगभूमी परिषद, अहमदनगर यांचे विशेष सहकार्यातून शिवजयंती उत्सव २०२३ निमित्ताने चित्रकला स्पर्धेचे आयोजन रविवार दि. १९ फेब्रुवारी २०२३ वेळ सकाळी ८.३० ते ११.३० या वेळेत आबासाहेब पटवर्धन शिशु विकास मंदिर, विद्या प्रबोधिनी शाळा, गजानननगर, कोपरगांव येथे करण्यात आले असल्याची माहिती सूर्यतेज संस्थापक वनश्री सुशांत घोडके यांनी दिली आहे.
“जागर शिव विचारांचा,उत्सव रयतेच्या राजांचा” हे या उत्सवाचे ब्रीद असून स्पर्धेसाठी प्रवेश फी नाही.स्पर्धेसाठी एकूण ७ गट तयार करण्यात आले असून प्रत्येक गटास स्वतंत्र विषय देण्यात आले आहे. गट-अ (इ. १ ली २ री) विषय : या स्पर्धकास छापिल चित्र देण्यात येणार असून त्याने रंगकाम करावयाचे आहे.गट – ब (इ.३ री ४ थी) विषय : निसर्गाच्या देखावा, गड किल्ले, आवडता वन्यजीव, गट – क ( इ. ५ वी ६ वी) विषय : वृक्षारोपण आणि संवर्धन, स्वच्छ सुंदर हरित कोपरगांव, गट – ड (इ. ७ वी ८ वी) विषय : शिवकालिन लोककला, शिवरायांचे बालपण, गट – इ (इ. ९ वी – १० वी) विषय : ऐतिहासिक स्थळ, मर्दानी खेळ, स्वच्छ भारत अभियान,गट – फ (खुला गट) विषय : छत्रपती शिवाजीराजे आज असते तर…,शिवराज्याभिषेक सोहळा, रयतेचा राजा,गट – ग) दिव्यांग (मुकबधीर) विषय : दिव्यांगांना समजलेल्या छत्रपती शिवरायांच्या जीवनातील प्रसंग या प्रमाणे विषय ठेवण्यात आले आहे.
प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि गुणवत्ता क्रमांकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, वृक्ष रोप देवून सन्मानित करण्यात येईल.


चित्रकला स्पर्धेचे नियम व अटी आणि सुचना – • प्रत्येक स्पर्धकाला फक्त कागद आयोजकांकडून देण्यात येईल. • स्पर्धकाने रंग साहित्य, हाताखाली पॅड स्वतःचे आणावयाचे आहे.• प्रत्येक गटाला वेगवेगळे विषय देण्यात आले असून स्पर्धकाने आपल्या कल्पनाशक्तीला वाव देवून चित्र रेखाटून रंगकाम करावे. • छापील चित्रांची पुनरावृत्ती टाळावी.
• सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकास राजे लखुजीराव जाधव यांचे तथा माँसाहेब जिजाऊ यांचे माहेरचे वंशज श्रीमान शिवाजी दत्तात्रेय राजेजाधव तसेच भारत सरकार आयुष मंत्रालयाचे निमंत्रित सदस्य व शिवचरित्र व्याख्याते डाॅ. शिवरत्न शेटे यांची डिजीटल स्वाक्षरी असलेले सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. • स्पर्धकास रंग माध्यमाचे बंधन नाही. • चित्र रेखाटून रंगविण्यास दिलेली वेळ बंधनकारक आहे. चित्र हे पुर्ण रंगविलेले असावे.(अपुर्णचित्र विचारात घेतले जाणार नाही.) विद्यार्थ्याने आपली नावे शाळेतील कला शिक्षकांकडे नोंदवावी. • प्रत्येक शाळेतून गट अ (१ली, २री), गट ब (३री, ४थी) करिता ५ स्पर्धकांचा सहभाग असावा. आणि गट क, ड, इ (५वी, १०वी) प्रत्येकी १० स्पर्धकांचा सहभाग असावा. • प्रत्येक शाळेच्या कला शिक्षकांनी, स्पर्धकाच्या नावाची यादी व खुल्या गटातील स्पर्धकांची नांवे स्पर्धा प्रमुख श्री. अतुल कोताडे (सर), मो. ९८२३२३४२४२ ( कलाशिक्षक, एस. जी. विद्यालय, कोपरगाव) यांचेकडे गटाप्रमाणे सोमवार दि. १३/२/२०२३ पर्यंत पुढीलप्रमाणे द्यावी. (अ.नं. । स्पर्धकाचे पुर्ण नांव । इयत्ता । तुकडी मोबाईल नंबर) • चित्रकला स्पर्धेतील फेरबदल, नियम, अटी आयोजकांनी राखून ठेवल्या आहे. • परिक्षकांचे निर्णय अंतिम राहिल. स्पर्धकाचे चित्र संस्थेकडे संग्रही राहील.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सूर्यतेज संस्थापक वनश्री सुशांत घोडके,स्पर्धा प्रमुख अतुल कोताडे, कलाध्यापक संघाचे अध्यक्ष संदिप चव्हाण,आढाव मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.हर्षद आढाव,विद्या प्रबोधिनीचे मुख्याध्यापक दत्तात्रेय गवळी, सूर्यतेज संस्थेचे सल्लागार प्रा.लताताई भामरे, अॅड. स्मिताताई जोशी,प्रा.कल्पना हेमंत गिते,कैलासराव सुर्यवंशी, प्रा.बी.एस.वाघ,प्रा.अनिल अमृतकर,अॅड.महेश भिडे,डाॅ.निलिमाताई आव्हाड, प्राजक्ता राजेभोसले, रविंद्र भगत,अनंत गोडसे,सुमित शिंदे,अजय कांगणे,अमोल पवार,आनंद टिळेकर यांचेसह सूर्यतेज संस्था,कोपरगांव, कोपरगाव तालुका कलाशिक्षक संघ,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बाल रंगभूमी परिषद,अहमदनगर, गोदातीर परिसर ईतिहास संशोधन मंडळ यांचे सह शिवप्रेमी व कलाप्रेमी प्रयत्नशील आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *