वारीत “बालगोपाळांचा कलाविष्कार सोहळा” उत्साहात संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील वारी येथील खोलवाट अंगणवाडीत चिमुकल्यांचा बाल आविष्कार सोहळा मंगळवारी (दि.२४) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी चिमुकल्यांनी विविध गाण्याच्या संगीतावर वेश परिधान करून, ठेका धरून आपल्यातील सुप्त गुणातून दर्जेदार कलाविष्कार सादर केले.
यामध्ये देश भक्तीपर गीत, हिंदी, मराठी गीतांचा समावेश होता. अगदीच दोन वर्षापासून तर पाच वर्षापर्यतच्या चिमुकल्यांनी उपस्थित सर्वाकडून वाह वाह मिळवत रोख स्वरूपात बक्षिसही मिळविले. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी चिमुकल्याना शेवटी पारितोषिकासह खाऊचे वाटप करण्यात आले. या विद्यार्थ्यांना अंगणवाडी सेविका अलका मेहरे, मदतनीस शीतल पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
या कलाविष्कार सोहळ्यात राजवर्धन टेके, जयवर्धन टेके, वेदांत टेके, विनय टेके, चैतन्य टेके, दुर्वा टेके, अर्णव टेके, आराध्या टेके, रोशनी गहिरे, दिव्यांका मेहरे, करण जगताप, सार्थक जगताप, आदर्श त्रिभुवन, सार्थक त्रिभुवन, देवांश पंडोरे या चिमुकल्यांनी बहरदार सादरीकरण केले. या सोहळ्याचे विषेश आकर्षण म्हणजे अंगणवाडी स्तरावर अशाप्रकारे चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठीचा आजवरचा पहिलाच प्रयोग होता. त्यामुळे या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी वारीच्या माजी उपसरपंच मनीषा गोर्डे, माजी सदस्य रोहिणी निळे, कमल डहारे, गोरख टेके, विवेक टेके, शिवाजी टेके, प्रदीप टेके, तुकाराम मोरे, अजय मेहरे, विजय निळे, कैलास इथापे, सचिन जगताप, सुरज टेके, राहुल टेके, बिपीन टेके, जगलेश पंडोरे, अंबादास गिरी, विठ्ठल टेके, शिरसाठ वस्ती शाळेचे मुख्याध्यापक निवृत्ती कांबळे, महेद्र महाले, अनिरुद्ध जाधव, मच्छिद्र मोरे, महेश शिंदे, राहुल गहिरे, रमेश आहेर, लहानू त्रिभुवन, वेडू मोकळ, सचिन मैंद, दत्तू जाधव, प्रज्वल निळे, प्रणाली निळे यांच्यासह माता पालक, अंगणवाडी सेविका ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका मेहरे यांनी केले तर शीतल पवार यांनी आभार मानले.

फोटोओळी:-
कोपरगाव तालुक्यातील खोलवाट परिसरातील अंगणवाडीतील चिमुकल्यांनी कलाविष्कार सादर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *