पुणतांबा येथे विद्यार्थ्यांनी जाणून घेतले ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
कोपरगांव तालुक्यातील कोकमठाण येथील तांत्रिक शैक्षणिक शेत्रात नव्याने पदार्पण केलेल्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष औषध निर्माण शास्त्र विद्यार्थ्यांची प्रथमच १६जानेवारी २०२३ रोजी पुणतांबा येथील ग्रामीण रुग्णालय पुणतांबा,
ग्रामपंचायतचे जलशुध्दीकरण केंद्र तसेच पुणतांबा येथील आशा केंद्र ट्रस्टचे संपूर्ण महाराष्ट्रात अर्धांग वायूच्या आयुर्वेदिक व पंचकर्म उपचारासाठी प्रसिद्ध आहे.तेथील औषधी वनस्पती व आयुर्वेदिक औषध निर्मिती विभागाला भेट दिली.प्रथम ग्रामीण रुग्णालयात भेट देण्यास विद्यार्थी व शिक्षक वृद गेले असता ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या बाहेर येऊन सर्वांचे स्वागत करून डि.फार्मसी विभागाच्या प्रमुख शिक्षिका
स्वाती फुलसौंदर,सोनिया देशमुख सिद्धी अंबिल्वादे त्याच प्रमाणे या भेटीसाठी विशेष प्रयत्न करणारे सागर जगदाळे या सर्वांचे रुग्णालयाकडून सत्कार करण्यात आला.
त्यानंतर डॉ.प्रतिभा शेलार व डॉ. श्रेया चौधरी यांना सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयाच्या सर्व कामकाज गव्हर्नमेंट स्कीम आजाराविषयी जागृती प्रतिबंध तसेच अभ्यास क्रमाविषयी माहिती व मार्गदर्शन केले.तसेच विद्यार्थ्यांना ग्रुप करून रुग्णालयामध्ये वेगवेगळ्या कक्षाची माहिती दिली. त्यात पेशंटचे तपासणी व त्यांच्या आजाराबद्दल माहिती दिली व शेवटी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.नितीन जैन यांच्या वतीने डी.फार्मसी विभाग प्रमुख स्वाती फुलसौदर मॅडम यांनी रुग्णालयातील सर्व डॉक्टर तसेच कर्मचारी यांचे आभार व्यक्त करीत डॉ. प्रतिभा शेलार,श्रेया चौधरी (मेडिकल ऑफिसर) आदिल शेख (आयसीटीसी समुपदेशक), निशिकांत बुगदे त्यानंतर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.नितीन जैन यांच्या वतीने डी.फार्मसी विभाग प्रमुख स्वाती फुलसौदर यांनी रुग्णालयातील सर्व डॉक्टर तसेच कर्मचारी यांचे आभार वक्ता करीत डॉ. प्रतिभा शेलार , श्रेया चौधरी (मेडिकल ऑफिसर) आदिल शेख (आयसीटीसी समुपदेशक), श्री निशिकांत बुगदे (फार्मसी ऑफिसर) तसेच इतर सर्व कर्मचारी या सर्वांचा फूल गुच्छा देऊन आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *