
कोपरगाव प्रतिनिधी:- जेऊरपाटोदा धारणगांव परिसरातील सौ.अनुराधा जयवंत जाधव (वय ६५) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांची ती बहीण होती.
कोपरगाव शहरातील अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिव देहावर रविवारी (२१) सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
