पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी कोपरगाव नगरीत अवैध धंद्यावर घातले छापे….

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
ता.24/2/2021 रोजी 19.35 वा.चे सुमारास धारणगांव रोड लगत असणारे दोन नंबरचे गाळयात इसम नामे एजाज निसार शेख वय 30 रा.वैष्णोदेवी मंदीराजवळ गांधीनगर कोपरगांव हा आपले स्वता:चे फायदयासाठी विनापरवाना बेकायदा टेबलावर 1 ते 10 अंक आकडे असलेला प्लेक्स बोर्ड लावुन त्यावर लोकांकडुन पैसे लावुन स्वता: पत्याचे कॅटचे सहाय्याने हारजितीचा रनिंग मटका 550-00 रु.रोख व जुगाराचे साहित्य, 1 ते 10 अंक आकडे असलेला प्लेक्स बोर्ड,व पत्याचा कॅट सह मिळुन आलेने सदर आरोपी विरुध्द कोपरगांव शहर पो.स्टे. गुरनं 62/2021 मुंजुकाक.12(अ) प्रमाणे कार्यवाही करणेत आलेली आहे.


तसेच ता.24/2/2021 रोजी 21.10 वा.चे सुमारास खुले नाटयगृहाजवळ असणारे गाळयात इसम नामे समीर हारुण सैय्यद वय 28 वर्षे रा.मक्का मजिदजवळ गांधीनगर कोपरगाव हा आपले स्वता:चे फायदयासाठी विनापरवाना बेकायदा टेबलावर 1 ते 10 अंक आकडे असलेला प्लेक्स बोर्ड लावुन त्यावर लोकांकडुन पैसे लावुन स्वता: पत्याचे कॅटचे सहाय्याने हारजितीचा रनिंग मटका 700-00 रु.रोख व जुगाराचे साहित्य, 1 ते 10 अंक आकडे असलेला प्लेक्स बोर्ड,व पत्याचा कॅट सह मिळुन आलेने सदर आरोपी विरुध्द कोपरगांव शहर पो.स्टे. गुरनं 63/2021 मुंजुकाक.12(अ) प्रमाणे कार्यवाही करणेत आलेली आहे.
तसेच ता.25/2/2021 रोजी 18.30 वा.चे सुमारास ,एस.टी. स्टॅण्ड ते अण्णाभाऊ साठे पुतळयाकडे जाणारे रोडचे पश्चीमेस असणारे गाळयाचे मागील बाजुस मोकळया भागात या ठिकाणी ईसम नामे संतोष सिताराम तांबे वय 31 वर्षे मारुती मंदीराजवळ गांधीनगर कोपरगांव हा आपले स्वता:चे फायदयासाठी विनापरवाना बेकायदा टेबलावर 1 ते 10 अंक आकडे असलेला प्लेक्स बोर्ड लावुन त्यावर लोकांकडुन पैसे लावुन स्वता: पत्याचे कॅटचे सहाय्याने हारजितीचा रनिंग मटका 1100-00 रु.रोख व जुगाराचे साहित्य, 1 ते 10 अंक आकडे असलेला प्लेक्स बोर्ड,व पत्याचा कॅट सह मिळुन आलेने सदर आरोपी कोपरगांव शहर पो.स्टे. गुरनं 64/2021 मु.जु.का.क.12(अ) प्रमाणे कार्यवाही करणेत आलेली आहे.


सदरची कार्यवाही पो.नि.श्री.वासुदेव देसले यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमी वरुन कोपरगांव शहर पो.स्टे.चे स.फौ.एस.जी. ससाणे. पोकॉ.आर.जी.खारतोडे, स.फौ.एस.सी.पवार, पोना. बी.एसकोरेकर,पोहेकॉ.ङि आर.तिकोणे अशांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *