कोपरगाव प्रतिनिधी:- वारी सारख्या ग्रामीण भागातील गावात सामाजिक उप्रकम, शैक्षणिक उप्रकम, वैद्यकीय उप्रकम, ग्रामस्वच्छता, पर्यावरण संवर्धनातून वृक्षारोपण, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत प्रचार प्रसार करणे, गावातील विविध क्षेत्रातील कर्तुत्वान महिलांचा, गुणवंत विधार्थ्यांचा, दिव्यांगांचा सन्मान करणे, गरजवंताना, वृद्धांना वस्त्रवाटप, वस्तूस्वरुपात मदत देणे, निराधारांना आधार देणे, अशा विविध उपक्रमावर काम करणाऱ्या राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चँरीटेबल ट्रस्टचे कार्य हे निश्चितच प्रेरणादायी असल्याचे गौरोद्गगार संगमनेर पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी काढले.
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील ग्रामपंचायत कार्यालय तसेच राहुल दादा मधुकरराव टेके पाटील चँरीटेबल ट्रस्ट संचलित मदत केंद्रास मंगळवारी (दि.६) संगमनेर पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी अनिल नागणे, कोपरगाव पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी सदिच्छा भेट दिली.
नागणे म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेच्या अनेक समस्या असतात. त्यातच निराधार, दिव्यांग, वयोवृद्ध, विधवा महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कागदपात्रांची जुळवाजुळव करताना अडचण निर्माण होते. त्यातून कधीकधी त्यांना योजने पासून वंचित राहावे लागते. परंतु, त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन वारीतील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चँरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुरु असलेले ‘मोफत मदत सेवा केंद्रातून” माणुसकीच्या भावनेतून या सर्व घटकांची सेवा सुरु आहे. गेली ३८ आठवडे अखंडितरित्या गावात स्वच्छता अभियान सुरु आहे. याच बरोबर ग्रामीण भागात माणुसकीची भिंत हा नाविन्यपूर्ण उपक्रम नव्याने सुरु केला आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
सचिन सूर्यवंशी म्हणाले, या गावात या ट्रस्टच्या माध्यमातून राबविले जाणारे विविध उपक्रम हे नाविन्यपूर्ण आहेत. विशेष म्हणजे ज्यावेळी गरजवंताना मदत केली जाते. त्यावेळी एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे ‘देणाऱ्यांच्या मनात अहंकार नाही आणि घेणाराच्या मनात संकोच नाही” तसेच ग्रामस्वच्छतेचे कार्य खूप महान आहे.
यावेळी संगमनेर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजेंद्र डोखे, ठाकूर, सरपंच सतीश कानडे, “लोकमत” चे उपसंपादक रोहित टेके, ग्रामविकास अधिकारी दिलीप वारकर, सडे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक अविनाश पगारे, कामगार तलाठी प्रसाद कदम, भाऊसाहेब टेके, मधुकर टेके, गजानन टेके, रावसाहेब जगताप, रवींद्र टेके, संजय कवाडे, नवनाथ कवडे, रावसाहेब वाघ, विशाल गोर्डे, मदन काबरा, प्रताप टेके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटोओळी:-
वारीतील मोफत मदत सेवा केंद्राला संगमनेर पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी अनिल नागणे, कोपरगाव पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी सदिच्छा भेट दिली.
