

कोपरगाव येथे भव्य परशुराम भवनाची निर्मिती कॅ. आशिष दामले, अध्यक्ष परशुराम आर्थिक विकास महामंडळ ( कॅबिनेट दर्जा प्राप्त)
ब्राह्मण समाजाची भुमिका नेहमीच सर्वाना बरोबर घेवुन जाण्याची असते….
कोपरगांव प्रतिनिधी:-
दरवर्षी प्रमाणे नऊ वर्षा पासुन सुरु असलेली ब्राह्मण सभा कोपरगावचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व नुतन नगराध्यक्ष व नगरसेवक सत्कार सोहळा नुकताच ब्राह्मण सभा, मंगल कार्यालय येथे उत्साहाने संपन्न झाला.
परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मा.कॅ.आशिष दामले यांच्या
शुभहस्ते ब्राह्मण सभा कोपरगाव दिनदर्शिका २०२६ चे प्रकाशन व सत्कार सोहळा पार पडला.या प्रसंगी मार्गदर्शन करतांना कॅ आशिष दामले म्हणाले की ब्राह्मण समाजाची भुमिका नेहमी सर्वाना बरोबर घेवुन जाण्याची असते.ते पुढे म्हणाले की कोपरगांव येथे जागा उपलब्ध झाल्यास महामंडळाच्या वतीने कोपरगांव शहरात भव्य दिव्य परशुराम भवनाची निर्मिती करण्यात येईल.

या वेळी त्यांनी ब्राह्मण सभेच्या कार्याचा गौरव करून त्यांनी पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक यांनी लवकरच कार्यालय समाजाला वापरण्यासाठी देण्यात येणार असल्याचे सांगितले.त्यांनी नुतन नगराध्यक्ष व नगरसेवक यांना ब्राम्हण सभेच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
या वेळी दिनदर्शिका जाहिरातदार यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ब्राह्मण सभेचे अध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर यांनी प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी नगराध्यक्ष श्री. संजय सातभाई होते.
या कार्यक्रमाला नुतन नगराध्यक्ष श्री. पराग संधान,जेष्ठ विधिज्ञ ॲड. जयंत जोशी,ब्राह्मण एकता परीषद शिर्डीचे अध्यक्ष वैभव पाटील,माजी नगराध्यक्षा ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई,नुतन सर्व नगरसेवक उपस्थित होते.
या वेळी उपाध्यक्ष बी. डी. कुलकर्णी, सचिव सचिन महाजन,सह सचिव संदीप देशपांडे, सदस्य वसंतराव ठोंबरे, संजीव देशपांडे, संघटक महेंद्र कुलकर्णी,योगेश कुलकर्णी,सौ.वंदना चिकटे,वनिता मंडळाच्या अध्यक्षा शैला लावर,सदाशिव कुलकर्णी,अजिंक्य पदे,गौरीष लव्हरीकर आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी खजिनदार जयेश बडवे यांनी सर्वाचे स्वागत केले. या प्रसंगी दिव्यांका परदेशीचा सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर म्हणुन चांगली कामगिरी बद्दल सत्कार केला गेला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. निर्मला कुलकर्णी, कु.आर्या महाजन यांनी केले तर आभार सहसचिव संदीप देशपांडे यांनी मानले. समारोप प्रसंगी स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
