गोदावरी बायोरिफायणारीज च्या निवडणुकीत अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी:- सतिष आण्णा कानडे…

Uncategorized

कामगार सहकारी पतपेढीच्या अटीतटीच्या लढतीत ९× ० ने धुव्वा उडवत विजयाची पुनरावृत्ती…
कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील वारी-साकरवाडी येथील सोमैय्या उद्योग समुहाच्या दि गोदावरी बायोरिफायणारीज लिमिटेड साकरवाडी येथील कामगार संघटनेच्या कामगार सहकारी पतपेढी या संस्थेच्या निवडणुकीत संस्थेचे संस्थापक कै साथी किशोर पवार यांच्या कोपरगाव तालुका साखर कामगार सभा या गटाचा दारुण पराभव झाला.
मागील पंचवार्षिक निवडणुकी प्रमाणेच नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही भारतीय कामगार कर्मचारी संघ संघटनेने संस्थेवर सलग दुसऱ्यांदा वर्चस्व स्थापन करून कामगारांचा विश्वास मिळवत विरोधकांना धुळ चारली आहे यावेळी विजयावर प्रतिक्रिया देतांना या पॅनलचे नेतृत्व करणारे सचिन दादासाहेब टेकेपाटील यांनी गोदावरी बायोरिफायणारीज च्या सर्व कामगार व अधिकारी यांचे विश्वास दाखविल्याबद्दल आभार मानले मिळालेल्या संधीचे सोने करून कामगारांच्या हिताचे निर्णय घेऊन यापुढेही संस्था व संघटना पुढे नेऊन कामगारांसाठी न भुतो न भविष्यती असे चांगले काम करुन दाखविणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला


दोनही गटाने निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने निवडणुकीत चुरस पहावयास मिळाली अटीतटीच्या या लढाईत भारतीय कामगार कर्मचारी संघ प्रणित पॅनलच्या सर्व नऊ उमेदवारांनी मोठयाप्रमाणात मताधिक्य मिळवत विजय खेचुन आणला पॅनलचे नेतृत्व करणारे सचिन दादासाहेब टेके पाटील यांनी सर्वाधिक १८२ मते मिळविली, सर्वसाधारण जागेवर राहुल रमेश कोकाटे, वसंतराव सूर्यभान वारकर,अशोक दामु गजभिव,बाबुराव शिवाजी मारकळी ,विजय भास्कर गोंदकर तर अनुसूचित जाती जागेवर मिलिंद मुकुंद हिवराळे ,इतर मागास प्रवर्ग महेश चांगदेव वालझडे,वि मा प्रवर्ग निलेश मधुकर गायकवाड यांनी विजय मिळवला


महिला राखीव जागेवर वंदना किशोर पवार व आलेस दिवाकर निळे यांची बिनविरोध निवड झाली आहे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन मा ठोंबळ साहेब यांनी काम पाहिले
सर्व विजयी उमेदवारांचे अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष मिलिंदजी तुळस्कर ,सरचिटणीस सुहासजी माटे, उपाध्यक्ष प्रशांतजी वर्तक ,विनोद गोगळे या मुंबईतील कामगार नेत्यांसह वारीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिशभाऊ कानडे, गोदावरी बायोरिफायणरी ज लि साकरवाडीचे डायरेक्टर सुहास गोडगेसाहेब , माजी सभापती मच्छिद्र टेके माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे,माजी सरपंच रावसाहेब टेके, उपसरपंच विशाल गोर्डे आदींसह गोदावरीच्या सर्व अधिकारी व कामगारांनी अभिनंदन केले आहे


विजय मिळविण्यासाठी सचिन टेके पाटील यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष नारायण वाळुंज,सरचिटणीस सुनिल महाले,उपाध्यक्ष गौतम मोरे, अशोक गजभिव,मधु गायकवाड,शेखनुर शेख ,विलास दाभाडे, अनिल निकम, अनिल सिंग, दत्ता शेलार, भगवान हुसळे, मधुकर मोरे, संतोष जगताप, राजपालसिग राजपुत,दादासाहेब वरकड, आर डी सोनवणे आदींनी विशेष परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *