कोकणगाव येथे एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण व कृषी निविष्ठा वाटप कार्यक्रम संपन्न….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली व उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. बी. टी. पाटील यांचे नियोजनाखाली उद्यानविद्या विभागअंतर्गत असलेल्या अखिल भारतीय समन्वित भाजीपाला संशोधन प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण व निविष्ठा वाटप कार्यक्रम कोकणगाव ता. संगमनेर येथील कृषी विभागाच्या बीजगुणन केंद्रामध्ये संपन्न झाला. यावेळी डॉ. शर्मिला शिंदे, डॉ. शालिग्राम गांगुर्डे संगमनेर येथील बीजगुण केंद्राचे उप कृषी अधिकारी श्री. टी.व्ही. सूर्यवंशी , मंडल कृषी अधिकारी श्री. विक्रम भवारी व कृषी सहाय्यक श्री. श्रीपत तरटे उपस्थित होते.
यावेळी झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये डॉ. शर्मिला शिंदे यांनी भाजीपाला पिकांचे दैनंदिन आहारातील महत्त्व,सेंद्रिय भाजीपाला लागवड, माती परीक्षणाचे महत्व, जैविक संवर्धन खतांचा उपयोग, डॉ. शालिग्राम गांगुर्डे यांनी भाजीपाला पिकांवरील किडींचे एकात्मिक कीड व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी शेतकऱ्यांना किट म्हणून भेंडी तोडणी यंत्र, सायकल कोळपे, खुरपी, शेवगा, शेंगा काढणी यंत्र, पिवळे चिकट सापळे व मका सोलनि यंत्र या कृषी निविष्ठांचे वितरण करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संगमनेर येथील उपविभागीय कृषी अधिकारी श्री. अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी श्रीमती रेजा बोडके यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. शर्मिला शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शिंदोडी, पिंपरने,तळेगाव, कोकणगाव तसेच परिसरातील 50 पेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *