
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील सुदेश पिक्चर पॅलेस मध्ये पल्याड या मराठी चित्रपटाचे उदघाटन समारंभ,पल्याड चित्रपटाचे लेखक सुदर्शन जी खडांगळे ,माजी नगराध्यक्ष मंगेश जी पाटील, सामाजिक कार्यकर्ते निसार भाई शेख,श्रीमान गोकुळचंद जी विद्यालय चे मुख्याध्यापक श्री कोरहाळकर सर ,सुरेश गोऱ्हे सर ,सौ.कल्याणी ताई बनसोडे, घोडके सर यांच्या उपस्थितीत व लेखक सुदर्शन यांच्या मातोश्री नंदा दिलीप खडांगळे यांच्या हस्ते चित्रपटाच्या उदघाटन फित कापुन उत्साहात पार पडले. त्त्यावेळेस लेखक सुदर्शन खडांगळे यांनी आपल्या कोपरगांवातील नागरीकांना चित्रपट बघण्यासाठी विनंती केली ते म्हणाले एखादया कलाकांराची कलाकृती जो पर्यन्त अपुर्ण असते जो पर्यन्त रसिकमाय बाप त्या कलाकृतीच कौंतुक करत नाही म्हणुन मी बनवलेल्या कलाकृतीला आपल्या महाराष्ट्राने आपल्या जिल्हयाने आपल्या तालुक्याने चित्रपट बघावा आणि आम्हा कलाकांराना आमच्या कामाची पोहोच पावती दयावी अशी विनंती प्रेक्षकांना केलीय. शुक्रवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी पल्याड हा मराठी चित्रपट कोपरगाव सह संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला या मराठी चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्राभर चांगला प्रतिसाद भेटत आहे प्रसिध्दीची अति उच्चतंम शिखर पार केलेल्या पल्याड चित्रपटाची चर्चा सर्वत्र होताना दिसतेय..


भारतात तच नव्हे तर अमेरिका, चीन, दक्षिण कोरीया, भुतान, न्युयॉरक, स्पेंन, लडंन, हॉगकॉग, टोरंटो, टोकीयों, सिक्कींम, न्यु दिल्ली, कोलकत्ता, तमिलनाडू, ढ़ाका, मुबई, स्विड़न, यु.एस.अे. अशा अनेक ठीकाणी फेस्टिंवेलद्वारे स्क्रींनिंग करण्यात आली. चित्रपटाचा चालु असलेला हा प्रवास थक्क करणारा आहे. “पल्याड” चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीचे तसेच विदेशी भुमीत आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व सक्षमरित्या पार पाडताना दिसतोय.. अवार्डस् ही मिळवतोय.. अशा अनेक ठीकाणी राष्ट्रीय, आतंरराष्ट्रीय, विदेशात जाऊन धुमाकुळ घालतोय… अमेरिकेच्याच नव्हे तर, जगातल्या सर्वात महत्वाच्या समजल्या जाणार्या Hollywood & Entertainment industry मधील “FORBES” आणि CINEQUEST या advancement & news संस्थे ने “पल्याड” (the other side) या चित्रपटाची दखल घेतली… या ऐतिहासिक घटनेची नोंद घेतली.. आणि परीनामी ‘पल्याड’ या मराठी चित्रपटाची महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाने निवड केलेल्या पाच चित्रपटामध्ये निवड झाली आहे. गोव्यात होणार्या ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात फिल्म बाजारमध्ये चित्रपटाची निवड करण्यात आली आहे अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. तसेच स्पेनमध्ये कँलेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कमी बजेटमध्ये तयार केलेल्या चित्रपटासाठी दिग्दर्शक शैलेश भीमराव दुपारे यांना बेस्ट दिग्दर्शकच्या अवार्ड जाहीर झालेला आहे. चित्रपटाला आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ऐकून २० ते २५ पुरस्कार मिळाले आहेत. मिडिया पासून सोशल मिडिया पर्यंत सर्वच ठिकाणी चित्रपटावर स्तुतिसुमने उधळी जात आहेत. या उदघाटना प्रसंगी उपस्थित मान्यवर, व चित्रपट प्रेमी पत्रकार श्री संजय लाड,श्री घोडके सर,श्री अमृतकर सर, श्री कोताडे सर, श्री गायकवाड सर,श्री नंदू भाऊ वाहडने, श्री राकेश सावजी,श्री प्रशांत म्हस्के, श्री शाम आहेर,श्री स्वनिल खडांगळे, पूजा खडांगळे, श्री रोहित खडांगळे, भक्ती खडांगळे,मंगल खंडांगळे, दुर्गा खडांगळे,अर्चना खडांगळे,रेखा खडांगळे,श्री राहुल खडांगळे,सागर खडांगळे, श्री कुणाल खडांगळे, श्री रंगनाथ खडांगळे, श्री राजेंद्र खडांगळे, ऋषिकेश खडांगळे, श्री बाळासाहेब खडांगळे, ताराबाई खडांगळे, श्री प्रकाश खडांगळे, श्री छबु राव वैद्य, श्री गोरख वैद्य, श्री विनायक बिडवे, गौरव बिडवे कार्यक्रमा प्रसंगी आदी उपस्थित होते
