ब्राह्यण सभा.कोपरगांवच्या वतीने संगणक अभियंता समिरण जयंतराव जोशी याचा गौरव समारंभ संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव येथिल जेष्ठ विधीज्ञ अॕड.जयंतराव जोशी यांचे चिरंजीव संगणक अभियंता चि.समिरण जयंतराव जोशी यांची अमेरिका येथे युटा प्रांतात साॅल्टलेक(सिटी) शहरातील युटा विद्यापिठात साडेपाच वर्षांचा परम संगणक शिक्षण आणि सेमी कंडक्टर यातील संशोधनासाठी निवड झाल्याबददल त्यांचा ब्राह्मण सभा.कोपरगांवच्या वतीने सत्कार करण्यात आला.
ब्राह्यण सभा.कोपरगांव चे अध्यक्ष श्री.मकरंद को-हाळकर यांनी प्रास्तविका मध्ये चि.समिरणची निवडआपल्या सर्वाच्या दृष्टीने खुप अभिमानाची गोष्ट आहे. त्याला या क्षेत्रात काम करायला मिळते ही एक प्रकारची देश सेवाच आहे असे त्यांनी सांगितले.
माजी नगराध्यक्ष श्री.संजय सातभाई यांनी संगणक अभियंता समिरण याला त्यांच्या घरातुन आई वडीला गुणवत्तेचा वारसा मिळाला असल्याने त्याने ती परंपरा पुढे सुरु ठेवली व त्या बाबत त्याचे कौतुक करुन त्याला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. चि. समिरण यांने माझा हा घरातला सत्कार असल्याने त्याचे माझ्या दृष्टीने महत्व मोठे आहे असे स्पष्ट केले व पुढील वाटचालीत करण्यात येणाऱ्या संशोधना विषयी माहीती दीली.आभार ब्राह्यण सभेचे उपाध्यक्ष श्री.बाळकृष्ण कुलकर्णी यांनी मानले.
चि.समिरण याची अमेरिका येथे युटा प्रांतात साॅल्टलेक शहरातील युटा विद्यापिठात साडेपाच वर्षांचा परम संगणक,सेमी कंडक्टर (हे संगणक नासा/ईस्रो वापरतात) या विषयावर संशोधनासाठी त्याची निवड झाली आहे तो १६ ऑगस्टला समीरण अमेरिकेला रवाना होत आहे.
चि.समीरण जेष्ठ विधीज्ञ ॲड.जयंतजी जोशी व ॲड.सौ.स्मीताताई जोशी यांचा मुलगा असुन प्रगतशील शेतकरी व गोसेवक श्री.धनंजय जोशी व सौ.दिपश्रीताई धनंजय जोशी आणि श्रीनिवास ट्रेडर्सचे संचालक श्री.मकरंदजी जोशी व गृहिणी सौ.मितालीताई जोशी यांचा पुतण्या आहे.
या कार्यक्रमाला ब्राह्यण सभेचे माजी अध्यक्ष श्री.संजीव देशपांडे , संघटक श्री.महेंद्र कुलकर्णी, तसेच जेष्ठ सदस्य बाळासाहेब कुर्लेकर,समीर कुलकर्णी,श्री.एस.पी.कुलकर्णी ,माधव जोशीसर,सौ.मंगला ठोंबरे सौ.कुलकर्णी,सौ.वाडेकर,श्री.प्रसाद ठोंबरे आदी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी जेष्ठ संगणक अभियंता समिरण जोशी यांचे ब्राह्यण सभेचे जेष्ठ मार्गदर्शक,माजी अध्यक्ष सुधाप्पा कुलकर्णी ,माजी नगराध्यक्षा सौ.ऐश्वर्यालक्ष्मी संजय सातभाई,ब्राह्यण सभा बांधकाम समितीचे अध्यक्ष,प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री.प्रसाद नाईक आदीनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *