वारीत गरजवंत लाभार्थ्याना कपडे, मिठाई वाटप,, दिवाळ सण : राहुल दादा टेके पाटील ट्रस्टचा सामाजिक उपक्रम…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील वारी येथील राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने ग्रामपंचायत सदस्य राहुल दादा टेके पाटील यांच्या स्मरणार्थ सामाजिक बांधिलकीतून गावातील सर्वच वयोगटातील सुमारे ५० गरजवंत (योग्य) लाभार्थ्यांना दिवाळीनिमित्त कपडे तसेच मिठाई वाटपाचा सामाजिक उपक्रम रविवारी ( दि.२३) वारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सतीश कानडे होते.
या कार्यक्रमासाठी कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे, कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, सोमैया उद्योग समूहाचे संचालक सुहास गोडगे, माजी सभापती मच्छिंद्र टेके, माजी पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, अशोक कानडे, बाजार समितीचे माजी सभापती सुरेश जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य मधुकर टेके, सुवर्णा गजभिव, कामगार तलाठी प्रसाद कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद कदम, डॉ. वैजयंती वैद्य, बाबासाहेब शिंदे, माजी सरपंच बद्रीनाथ जाधव, ताराचंद पडघडमल, पत्रकार जनार्दन जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत रोहित टेके यांनी केले. यावेळी मच्छिंद्र टेके, सुरेश जाधव, सुहास गोडगे, तहसीलदार विजय बोरुडे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी या उपक्रमाचे स्वागत करीत स्व. राहुल टेके यांच्या सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमात दिवाळीनिमित्त मिळालेल्या या मदतरूपी भेटीमुळे लहानग्यापासून, वयोवृद्ध आजी-आजोबा, माता- भगीनीच्या चेहऱ्यावरील आनंद सर्वाना समाधान देणारा होता. या कार्यक्रमासाठी राजेंद्र टेके, भाऊसाहेब टेके, मधुकर टेके, रावसाहेब जगताप, दिलीप आवारे, रवींद्र टेके, भीमा आहेर, तुकाराम मोरे, धोंडीबा वाकचौरे, मदन काबरा, वसंत टेके, संदीप जाधव, विजय निळे, अशोक गजभिव, हरिभाऊ टेके, चंद्रकांत पाटील, दौलत वाईकर, मच्छिंद्र मुरार, अतुल टेके, डॉ. सर्जेराव टेके, योगेश शिंदे, संदीप गायकवाड, संजय कवाडे, दिनेश निकम, रावसाहेब वाघ, सतीश गायकवाड, अशोक निळे, मधुकर सोनवणे, रघुनाथ आहेर, अंबादास गिरी, भास्कर बोर्डे, सुंदर पगारे, मनोज जगधने मदत यांच्यासह सेवा केंद्र व ग्रामस्वच्छता अभियानाचे सर्व सदस्य उपस्थित सर्वच मान्यवर, मित्र परिवार, टेके कुटुंबीय तसेच लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. रवींद्र जाधव यांनी तर गोरख टेके यांनी आभार मानले.

फोटोओळी:-
वारीत टेके पाटील ट्रस्टमार्फत दिवाळीनिमित्त योग्य लाभार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते कपडे, मिठाई वाटप करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *