आडगाव ट्रक टर्मिनल समोर ओव्हर ब्रिज उभारा:- राजेंद्र फड…

Uncategorized

आडगाव ट्रक टर्मिनल समोरील अपघात टाळण्यासाठी ओव्हर ब्रिज बांधण्यात यावा; नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनची मागणी…
कोपरगाव प्रतिनीधी
(नाशिक):- आडगाव ट्रक टर्मिनल समोर मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने याठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून ओव्हर ब्रिज बांधण्यात यावा अशी मागणी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन च्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम.सैनी यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे व जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांना निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक शहरालगत मुंबई-आग्रा महामार्गावर आडगाव येथे आडगाव ट्रक टर्मिनल विकसित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. तसेच मुंबई-आग्रा हायवेवर वाहतूक अधिक असल्याने या ठिकाणी अपघाताचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला असून अनेकांना अपंगत्व देखील आले असल्याचे म्हटले आहे.
पुढे म्हटले आहे की, आडगाव ट्रक टर्मिनल समोर वारंवार अपघात होत असल्याने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे. प्रथम दर्शनी या ठिकाणी अपघाताला आळा घालण्यासाठी स्पीड ब्रेकर यंत्रणा विकसित करण्याची आवश्यकता आहे. तसेच मुंबई आग्रा महामार्गावर नाशिक ते चांदवड दरम्यान वाहतूक सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना म्हणून अनेक ठिकाणी ओव्हर ब्रिज ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण देखील घटले आहे. त्याच धर्तीवर आडगाव ट्रक टर्मिनल समोर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून ओव्हर ब्रिज विकसित यावी अशी सर्व वाहतूकदारांची मागणी आहे. सदर ठिकाणी ओव्हरब्रिज विकसित झाल्यास येथील वाहतुकीचा प्रश्न मागे लागून अपघातांचे प्रमाण देखील कमी होणार असल्याचे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *