नवरात्रोत्सव निमित्त सामुदायिक महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् चे वाचन…

Uncategorized

अंबिका देवी मंदिर, कोपरगावच्या प्रांगणात डाॅ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयाच्या २०१ विद्यार्थ्यांनींचा सहभाग…

श्रीमंत प्रगत नवरात्रोत्सव मंडळ,अंबिका तरुण मंडळाचे आयोजन…
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील जुने गावठाण भागातील कुंभारवाड्यालगत शेकडो वर्षांची परंपरा असलेले श्री भवानी देवी मंदिराचे प्रांगणात डाॅ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयाच्या २०१ विद्यार्थ्यांनींनी सहभागी होवून संस्कृत भाषेतील “महिषासुरमर्दिनी स्तोत्रम्” चे शब्द आणि स्वरांचा सुरेख संगम साधत सामुदायिक वाचन केले.
या प्रसंगी प्रसिद्ध कथाकार ह.भ.प.गणपत महाराज लोहाटे,डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयाच्या प्राचार्य मंजुषा सुरवसे,श्री भवानी देवी मंदिराचे व्यवस्थापक सौ.ऊषा भालचंद्र गायकवाड,अध्यक्ष विनायक गायकवाड,श्रीमंत प्रगत चे संस्थापक संतोष साबळे, जनार्दन शिंदे,सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके,संस्कृत शिक्षिका शोभा दिघे,प्रसिद्ध व्यापारी सुनील बोरा,नवभारत सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक योगेश वाणी,संजय आढाव, यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. श्री भवानी देवी मंदिर ट्रस्ट,कोपरगाव, श्रीमंत प्रगत नवरात्रोत्सव मंडळ,अंबिका तरुण मंडळाचे वतीने डॉ.सी.एम मेहता कन्या विद्यालयाच्या २०१ विद्यार्थ्यांनींचे सामुदायिक “महिषासुरमर्दिनी स्तोत्रम्”चे वाचन नवरात्रोत्सवाच्या नवमी निमित्त आयोजन करण्यात आले होते. संस्कृत ही प्राचीन भाषा असून अनेक ग्रंथ दूर्मिळ दस्त याच भाषेत आढळतात.संस्कृत भाषेचे ज्ञान शालेय विद्यार्थ्यांना अवगत रहावे. या भाषेची अभिवृद्धी व्हावी.म्हणून संस्कृत भाषेतील विविध स्तोत्रे,श्लोकांचे निरंतर वाचन सुरु असते.नियमित वाचनाने उच्चार सुधारणा होण्यास मदत होते.


“महिषासुरमर्दिनी स्तोत्रम्” पठणा नंतर प्राचार्य सौ.मंजुषा सुरवसे,सौ.मनिषा संतोष साबळे,सौ.उर्मिला शुभम गायकवाड, शाळेच्या विद्यार्थ्यांनी यांचे शुभहस्ते आरती करण्यात आली.त्यानंतर लाडू व फळांचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी प्राचार्य आणि शिक्षिकांना शाल,श्रीफळ देऊन आयोजकांनी स्वागत केले.
प्रसिद्ध कथाकार गणपत महाराज लोहाटे यांनी लहान मुलांचे संस्कृत वाचनाने भारावून गेलो. शिक्षणातून संस्कारक्षम व्हावे.असे सांगत विद्यार्थिनींना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शेकडो वर्षांपासून अंबिका देवी मंदिरात भवानी देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सव निमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात.


या उपक्रमास प्राचार्य मंजुषा सुरवसे, संस्कृत शिक्षिका शोभा दिघे,सविता चंद्रे,रुपाली शिंदे,प्रकाश टपळे, कैलास राठोड,श्रीमती शांताबाई गायकवाड,सौ,तृप्ती गायकवाड,सौ मंगल गायकवाड, अंबिका तरुण मंडळाचे अध्यक्ष शुभम गायकवाड,निवृत्ती गायकवाड,भालचंद्र गायकवाड,देविदास गायकवाड,गोपी गायकवाड,शाम मापारी, बंडोपंत गायकवाड,निकेतन गायकवाड,वाल्मीक गोसावी, श्रीमंत प्रगतचे संतोष साबळे, जनार्दन शिंदे,गणेश बिडवे,सोमेश शिंदे,अतुल कहार,ओंकार डागा,प्रणव जोशी,केशव बजाज,ओम बोराडे,साई गवारे,विशाल डागा,धनराज लकारे ,सोपानराव नाईक,सुदाम लकारे,रत्नाकर जाधव,वामन भाऊ गोसावी यांचे सह भाविक,अंबिका तरुण मंडळ आणि श्रीमंत प्रगतचे सदस्य उपस्थित होते.अंबिका मंदिरात यापुढेही असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक गायकवाड यांनी केले आहे.
“महिषासुरमर्दिनी स्तोत्रम्” वाचनाने परिसराचे वातावरण भक्तिमय झाले होते.भाविकांनी विद्यार्थ्यांनींचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *