प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा – नवरात्रौत्सव २०२२’ मध्ये पाचव्या दिवशी विविध मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते आरती करण्यात आली…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा – नवरात्रौत्सव २०२२’ मध्ये पाचव्या दिवशी हलवाई महिला मंडळ, ब्राह्मण समाज महिला मंडळ व साई मंजिरी महिला मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली.


तसेच यावेळी आयोजित दांडिया व प्रश्नमंजुषा स्पर्धेला नेहमीप्रमाणे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. ऐश्वर्याताई सातभाई, माजी नगरसेविका सौ. प्रतिभाताई शिलेदार, वर्षाताई गंगूले, सौ. माधवीताई वाकचौरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा सौ. स्वप्नजाताई वाबळे, सुनेत्राताई कुलकर्णी, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या सदस्या व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *