नवरात्रोत्सवानिमित्त वेशभूषा स्पर्धेचे आयोजन,, विद्याप्रबोधिनी शाळा कोपरगावचा उपक्रम…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
नवरात्र उत्सव निमित्त विद्या प्रबोधिनी प्राथमिक शाळा,कोपरगाव, आबासाहेब पटवर्धन शिशू विकास मंदिर येथे वेशभूषा स्पर्धा संपन्न झाली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी शेतकरी,दूधवाला,छत्रपती शिवाजी महाराज,नेताजी सुभाषचंद्र बोस,भगतसिंग,पंडित नेहरू, सावित्रीबाई फुले, शिक्षिका, इंजिनिअर,भाजीवाली,भंगारवाला, डॉक्टर,एपीजे अब्दुल कलाम आझाद,परी, क्रिकेटर अशा वेगवेगळ्या वेशभूषा परिधान केल्या होत्या.

     स्पर्धेचे परीक्षक म्हणून सूर्यतेज संस्थापक श्री सुशांत घोडके व सूर्यतेज सदस्य प्रा. शिवानी गवळी हे होते.या स्पर्धेत इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

गट-अ (इयत्ता पहिली ते दुसरी)
प्रथम क्रमांक-भाविका सागर वानखेडे(भरतनाट्यम), द्वितीय क्रमांक- राजवीर विजय शिंदे(सैनिक), तृतीय क्रमांक-पंडोरे श्रेया गणेश (परी) उत्तेजनार्थ रेणुका जितेंद्र गावडे (शिक्षिका)

गट-ब (इयत्ता तिसरी व चौथी)
प्रथम क्रमांक- स्वानंद संतोष शेंदुर्णीकर (छत्रपती शिवाजी महाराज),द्वितीय क्रमांक-देव संतोष डागा (भगतसिंग), तृतीय क्रमांक कार्तिक संजय आहेर (दूधवाला) उत्तेजनार्थ प्रांजल मनोज हांडे(देवी महालक्ष्मी) उत्तेजनार्थ मनीष श्रीकांत वहाडणे (वारकरी)

गट-क (इयत्ता पाचवी ते सातवी)
प्रथम क्रमांक-दर्शन गुरव (नेताजी सुभाषचंद्र बोस), द्वितीय क्रमांक-शारंग वादक(भंगारवाला),तृतीय क्रमांक आर्या ईश्वरदास साबळे(सावित्रीबाई फुले) उत्तेजनार्थ साक्षी गोरक्ष बुधवंत (डॉक्टर) व श्रृती अनिल आव्हाड(जिजामाता)
वरील सर्व स्पर्धकांचे मुख्याध्यापक श्री.दत्तात्रय गवळी सर तसेच शिशुविकास मुख्याध्यापिका सौ.सरिता को-हाळकर मॅडम यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.नितीन शेटे सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजनात शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री गवळी सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *