
कोपरगाव प्रतिनिधी:-
मातंग समाजाच्या शैक्षणिक,सामाजिक व आर्थिक प्रश्न सोडवाव्या अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांना एका लेखी निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती
लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी दिली
आज कोपरगाव येथे जेष्ठ पँथर नेते प्रकाश कोपरे यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देण्यासाठी आठवले आले होते त्यावेळी लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने
ना आठवले यांची भेट घेतली असता त्यांना मातंग समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले या निवेदनात मातंग समाजाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक सामाजिक, आर्थिक विकास व्हावा या साठी स्वतंत्र आरक्षनाची मागणी होत आहे मा सर्वोच्च न्यायालय अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे लोक संख्येच्या प्रमाणात वर्गीकरण व्हावे या साठी राज्यांनी निर्णय घ्यावा या बाबत अनुकूल असल्याचे मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देण्यात आले, बार्टी प्रमाणे आर्टीची स्थापना करण्यात येऊन मातंग तरुणांना प्रशासकीय सेवेत संधी मिळावी व मातंग समाजातील तरुणांना सनदी अधिकारी होता यावे या साठी प्रयत्न व्हावे, साहित्य रत्न लोक शाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाला एक हजार कोटी रुपये भांडवल देण्यात येऊन मातंग समाजाचा आर्थिक विकासासाठी ठोस कृती कार्यक्रम आखावा, तसेच अण्णा भाऊ साठे यांच्या सुवर्ण मोहत्सवी जयंतीनिमित्त भारतरत्न सन्मानाने सन्मानित करावे तसेच चिराग नगर येथे जागतिक दर्जाचे स्मारक व संगमवाडी पुणे येथे क्रांतिगुरु लहुजी स्मारक उभारणी साठी निधी उपलब्ध करून घ्यावा या मागण्या निवेदना द्वारे करण्यात आल्या
या वेळी लहुजी टायगर सेनेचे शरद त्रिभुवन, संजय तुपसुंदर उपस्थित होते
